फोटो सौजन्य- iStock
नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) मध्ये काम करण्याची इच्छा बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्हाला सरकारी क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे किंवा जर तुम्हाला सरकारी क्षेत्रामध्येच आपले करिअर घडवायचे आहे, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. NCERT ने भरती प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या भरती प्रक्रियेत, NCERT विशेषतः २ पदांवर लक्ष देत आहे. या पदांमध्ये एनसीईआरटी ने सीनियर रिसर्च एसोसिएट (SRA) तसेच जूनियर प्रोजेक्ट फेलो (JPF) च्या ५ रिक्त जागांसाठी उमेदवारणाची नियुक्ती करण्यास भरती प्रक्रियेला सुरुवात केली आहे. योग्य त्या उमेदवाराची निवड या भरती प्रक्रियेमध्ये करण्यात येईल असे NCERT कडून सांगण्यात आले आहे.
हे देखील वाचा : राज्य कौशल्य विद्यापीठामुळे रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध: कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा
NCERT च्या या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज नोंदवण्यास सुरुवात केली आहे. एकंदरीत, इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करण्याचे निर्देश भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊ इच्छुक असलेल्या उमेदवारांना दिले आहे. अर्ज संपूर्णरीत्या ऑनलाईन स्वरूपात होणार असून NCERT ने या संदर्भात अधिसूचना जारी केले आहे. अधिसूचनेचा आढावा घेत भरती प्रक्रियेबद्दल सखोल अभ्यास करण्यासाठी उमेदवारांनी NCERT च्या ncert.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. एकंदरीत, येथेच अर्ज करता येणार आहे.
NCERT ने जाहीर केलेल्या अधिसूचनेमध्ये काही अटीशर्तींची तरतूद केली गेली आहे. इच्छुक उमेदवारांना या अटीशर्तींना पात्र होणे अनिवार्य आहे. वयोमर्यादे विषयक असलेल्या अटीनुसार, सीनियर रिसर्च एसोसिएट (SRA) या पदासाठी अर्जकर्त्या उमेदवारांची आयु कमाल ४५ वर्षे इतकी असावी, तर जूनियर प्रोजेक्ट फेलो (JPF) पदासाठी उमेदवारांची आयु कमाल ४० वर्षे असणे अनिवार्य आहे. महत्वाचे म्हणजे दोन्ही पदासाठी अनुभवी उमेदवार हवे आहेत. अधिक अटींविषयी जाणून घेण्यासाठी अधिसूचनेचा आढावा घ्यावा.
हे देखील वाचा : बांधकाम कामगारांसाठी राज्यात 304 सेतू केंद्र सुरु, तालुक्याच्या ठिकाणी करता येणार नोंदणी
सीनियर रिसर्च एसोसिएट (SRA) पदी नियुक्त झालेल्या उमेदवारांना ३५,००० दरमाह वेतन मिळण्याची शक्यता आहे, तर जूनियर प्रोजेक्ट फेलो (JPF) पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला ३१,००० रुपये दरमाह वेतन मिळेल. या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवाराला कोणतीही लिखित परीक्षा देण्याची गरज भासणार नाही आहे. वॉक इन इंटरव्ह्यूच्या माध्यमातून उमेदवाराची निवड केली जाईल.