RRB (फोटो सौजन्य- पिंटरेस्ट)
रेल्वे भरती मंडळाने सुमारे ९९०० पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती असिस्टंट लोको पायलट (ALP) करिता आहे. याची छोटी सूचना रोजगार बातम्यांमध्ये प्रकाशित झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारिक ९ मे २०२५ आहे. लवकरच नवीन आरआरबी एएलपी भरतीची सविस्तर सूचना आरआरबी वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाणार. २०२४ एएलपी भरतीमध्ये अर्ज करू शकलेल्या आणि सीबीटी-१ उत्तीर्ण न झालेल्या तरुणांना या भरतीचा फायदा होईल. गेल्या वर्षी जानेवारी २०२४ मध्ये रेल्वेने असिस्टंट लोको पायलटच्या ५६९६ पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली होती. जी नंतर १८,७९९ पर्यंत वाढवण्यात आली. सध्या त्याची CBT 2 प्रक्रिया सुरू आहे. रेल्वे भरती मंडळाने त्यांच्या कॅलेंडरमध्ये दरवर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान नवीन असिस्टंट लोको पायलट भरती जाहीर करण्याची घोषणा केली होती.
IBPS क्लार्क परीक्षेचा निकाल जाहीर; अर्ज कर्त्यांनो! अशा प्रकारे पहा निकाल
नवीन भरतीची पात्रता, निवड आणि परीक्षा प्रक्रिया सविस्तर अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतरच उघड होईल. मागील भरतीच्या आधारित आरआरबी एएलपी भरतीची अपेक्षित पात्रता आणि निवड प्रक्रिया काय आहे बघुयात.
पात्रता: १०वी उत्तीर्ण आणि आयटीआय किंवा १० वी आणि संबंधित ट्रेडमध्ये तीन वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा. डिप्लोमाच्या जागेवर संबंधित ट्रेड मध्ये इंजीनियरिंग डिग्री सुद्धा चालेले.
वय: १८-३० वर्ष, एससी/एसटींना पाच वर्षे आणि ओबीसींना तीन वर्षे सूट मिळेल.
निवड आणि परीक्षा प्रक्रिया: निवड प्रक्रियेत कदाचित हे टप्पे असतील
१. पहिला टप्पा CBT (संगणक आधारित चाचणी),
२. दुसरा टप्पा CBT,
३. संगणक आधारित अभियोग्यता चाचणी
४. कागदपत्र पडताळणी.
एएलपी पदांच्या भरतीसाठी, दोन टप्प्यांची परीक्षा (पहिला टप्पा सीबीटी आणि दुसरा टप्पा सीबीटी) सामान्य असेल. पहिल्या टप्प्यातील CBT मध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांनाच दुसऱ्या टप्प्यातील CBT साठी बोलावले जाईल. दुसऱ्या टप्प्यातील CBT उत्तीर्ण झाल्यानंतर, कंप्यूटर बेस्ड एप्टीट्यूड टेस्ट (AT) द्यावी लागेल.
निगेटिव्ह मार्किंग
पहिला आणि दुसऱ्या टप्प्यात निगेटिव्ह मार्किंग असणार. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक तृतीयांश गुण वजा केले जातील. कंप्यूटर बेस्ड एप्टीट्यूड टेस्ट मध्ये कोणतेही नकारात्मक गुण असणार नाहीत.
पहिला टप्पा CBT कसा असेल
पहिल्या टप्प्यातील संगणक आधारित लेखी परीक्षा १ तासाची असेल ज्यामध्ये ७५ प्रश्न विचारले जातील. परीक्षेत पात्र होण्यासाठी, अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांना ४०%, ओबीसी उमेदवारांना ३०%, एससी उमेदवारांना ३०% आणि एसटी उमेदवारांना २५% गुण मिळणे आवश्यक आहे.अन्यथा तुम्हाला इथेच थांबवले जाणार. तुम्ही पुढल्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार नाही. यामंडई तुम्हाला गणित, तर्क, सामान्य विज्ञान, सामान्य ज्ञान/चालू घडामोडींशी संबंधित प्रश्न विचारले जातील.
दुसरा टप्पा CBT कसा असेल
पहिल्या टप्यात परीक्षेत पात्र ठरल्यास दुसऱ्या टप्यात तुमच्या परीक्षेत बसवले जाणार. ही परीक्षा २ घंटे ३० मिनिटाची असेल. पेपर दोन भागात वाटले जाणार. पार्ट ए आणि पार्ट बी।
पार्ट ए (A )
पार्ट ए साठी ९० मिनिटांचा वेळ असतो आणि यात १०० प्रश्न असतात. याला पात्र करण्यासाठी सुद्धा अनारक्षित श्रेणीच्या उम्मेदवारांसाठी ४०%, ओबीसी उम्मीदवारांसाठी ३०%,अनुसूचित जातीच्या उमेदवारांना ३०% आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना २५% गुण मिळणे आवश्यक आहे. भाग अ मध्ये, गणित, तर्क, सामान्य विज्ञान, सामान्य ज्ञान/चालू घडामोडींशी संबंधित प्रश्न विचारले जातील.
पार्ट बी (B)
पार्ट बी लिहिण्यासाठी १ तासाचा वेळ असेल. यामध्ये एकूण प्रश्नांची संख्या ७५ असेल. पार्ट बीमध्ये पात्र होण्यासाठी, सर्व श्रेणीतील उमेदवारांना ३५% गुण मिळवणे आवश्यक आहे.पार्ट बी मधील व्यापार अभ्यासक्रमातील प्रश्न येईल.
तिसरी पायरी
दुसऱ्या टप्प्यातील भाग अ मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या आणि भाग ब मध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना यासाठी बोलावले जाईल. या टप्प्यात, सर्व श्रेणीतील उमेदवारांना किमान ४२ गुण मिळवावे लागतील, कोणत्याही प्रकारची सूट दिली जाणार नाही.
शेवटचा टप्पा कागदपत्रांची पडताळणी असेल
अर्ज शुल्क:- रु.५००. सीबीटी १ परीक्षेत सहभागी होणाऱ्यांना ४०० रुपये परत केले जातील.
एससी, एसटी, महिला, ईबीसी, अपंग २५० रुपये. सीबीटी १ परीक्षेत सहभागी होणाऱ्या व्यक्तीचे संपूर्ण २५० रुपये परत केले जातील.
Ghibli: घिबली, जिबली की गिबली? नेमका उच्चार जाणून घ्यायचाय? मग आमची बातमी वाचाच…