फोटो सौजन्य - Social Media
बेरोजगारीच्या काळात नोकरीसाठी संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक चांगली बातमी आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने चंदीगड येथे चपराशी (Residential Peon) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती न्यायालयातील माननीय न्यायमूर्ती आणि रजिस्ट्रार यांच्या निवासस्थानी सेवा पुरवण्यासाठी आहे. यासाठी एकूण 75 पदे रिक्त असून, 14 जुलै 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे आणि 4 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ही संधी उपलब्ध आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांनी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवारांकडे कुकिंग डिप्लोमा किंवा स्वयंपाकाचा अनुभव असणे गरजेचे आहे, कारण निवड प्रक्रियेत प्रॅक्टिकल कुकिंग टेस्ट घेण्यात येणार आहे.
ही परीक्षा दोन टप्प्यांत होणार आहे. प्रथम टप्पा म्हणजे 80 गुणांची प्रॅक्टिकल टेस्ट असेल, ज्यामध्ये किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे. दुसऱ्या टप्प्यात 20 गुणांची मुलाखत होईल, ज्यासाठी किमान 10 गुण आवश्यक आहेत. दोन्ही टप्प्यांत उत्तीर्ण उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल. निवड प्रक्रियेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची नियुक्ती चंदीगड येथे करण्यात येणार आहे.
अर्ज प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांनी www.highcourtchd.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करताना पासपोर्ट साईज फोटो अपलोड करणे, आवश्यक कागदपत्रे जोडणे आणि अर्ज शुल्क भरणे बंधनकारक आहे. शुल्क General श्रेणीसाठी ₹700, SC/ST व Ex-Servicemen साठी ₹600 ठेवण्यात आले आहे. एकूण 75 जागांपैकी 63 जागा सामान्य प्रवर्गासाठी, 8 जागा अनुसूचित जाती-जमातीसाठी आणि 4 जागा माजी सैनिकांसाठी राखीव आहेत.
उमेदवारांनी भरतीची अधिसूचना काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा व आपला अर्ज सबमिट केल्याची प्रत व शुल्क पावती भविष्यासाठी जतन करावी. चांगले काम करणाऱ्या उमेदवारांना सरकारी नोकरी मिळण्याची ही उत्तम संधी आहे. जर तुम्ही दुसऱ्या राज्यात काम करण्यास इच्छुक असाल, तर ही भरती तुमच्यासाठी योग्य आहे. योग्य पात्रता व तयारीसह नक्की अर्ज करा आणि सरकारी नोकरीच्या दिशेने पहिलं पाऊल टाका.