फोटो सौजन्य - Social Media
चार्टर्ड अकाउंटंटची परीक्षा देशातील कठीण परीक्षांपैकी एक आहे. दरवर्षी असंख्य विद्यार्थी या परीक्षेसाठी उपस्थित राहतात परंतु त्यातील काहीच जण या परीक्षेला पात्र करण्यात यश प्राप्ती करतात. ही परीक्षा पात्र करण्यासाठी सखोल ज्ञानाची आवश्यकता असते. योग्य नियोजन असावे लागते तसेच शिस्तबद्ध अभ्यास पद्धती आवश्यक आहे. चार्टर्ड अकाउंटंट च्या परीक्षा मध्ये अभ्यास आणि त्यातील कौशल्यांना विशेष महत्त्व दिले जाते. सीए परीक्षेचे अभ्यासक्रम व्यापक आहे. त्यामध्ये वित्तीय लेखापरीक्षण, कराधान, लेखाकारण, आर्थिक व्यवस्थापन, विधी, आणि इतर महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. सीए परीक्षा मध्ये असणाऱ्या अभ्यासक्रमाचा प्रत्येक भाग विद्यार्थ्याने समजून घेतला पाहिजे. विभागांनुसार अभ्यासाची तयारी करा आणि परीक्षेत उत्तम गुण मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहा.
हे देखील वाचा : रेल्वेमध्ये ग्रुप ‘डी’ पदांसाठी भरती; ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज
चार्टर्ड अकाउंटंट च्या परीक्षेसाठी अभ्यास करताना एक नियमित वेळापत्रक असणे गरजेचे आहे. अभ्यासाचे नियोजन असणे गरजेचे आहे. आपण दिवसात किती अभ्यास करतो? कसला अभ्यास करतो? या सगळ्या बाबी आपल्या यशप्राप्तीसाठी मूलभूत आहेत. दिवसातून आपण किती वेळ अभ्यास केला पाहिजे? याचे योग्य नियोजन असू द्यात. प्रत्येक विषयाला आवश्यक वेळ द्या आणि पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी एक ठरावीक तारीख ठेवा. परीक्षांमध्ये मुख्य विषय जास्त अभ्यासा. या विषयांमध्ये जास्त गुण मिळण्याची शक्यता अफाट असते. या विषयांवर अधिक लक्ष केंद्रित करणे फायद्याचे ठरते. पण अभ्यास करत असताना आपल्या नजरेखाली येणारे महत्त्वाचे प्रत्येक मुद्दे आणि सूत्रे स्वतःच्या शब्दाने एखाद्या वहीमध्ये लिहून ठेवावे. परीक्षेच्या वेळी अभ्यास करताना ही पद्धत कामी येते. नोट्स तयार केल्याने विषयांची पुनरावृत्ती सहज शक्य होते आणि परीक्षेपूर्वी जलद पुनरावलोकन करता येते.
परीक्षेत वेळेचे व्यवस्थापन फार महत्त्वाचे असते. दिलेला वेळेत आपल्याला आपली परीक्षा पार पाडावी लागते. त्यासाठी आपण गेल्या वर्षीची प्रश्नपत्रिका अभ्यासू शकतो. गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेला दिलेल्या वेळेमध्ये पूर्ण करण्याचे प्रयत्न करावे. तसेच परीक्षा झाल्यावर आपण किती प्रश्नांची उत्तरे योग्यरीत्या सोडवले ते पहावेत. मॉक टेस्टद्वारे आपले वेळ व्यवस्थापन कौशल्य सुधारता येते आणि परीक्षेतील टाईम प्रेशर सांभाळणे सोपे होते.
हे देखील वाचा : RBI मध्ये मेडिकल कन्सल्टंटच्या पदासाठी भरती प्रक्रिया; लवकर करा अर्ज
सीए अभ्यासक्रमात काही विषय कठीण असतात. त्यावर अधिक मेहनत घ्या, जर कुठल्याही भागात अडचण येत असेल तर मार्गदर्शन घेण्यास संकोच करू नका. योग्य शिकवणी किंवा मार्गदर्शक मिळवणे फायद्याचे ठरते. परीक्षेच्या काळात त्यांना मुक्त राहणे अतिशय महत्त्वाचे असते. अभ्यास करणे महत्त्वाचे असते तसेच विश्रांती घेणे फार महत्त्वाचे असते. अभ्यास करताना म्हणाला ताजेतवाने राखणे आवश्यक आहे. तरच मानसिक स्थैर्य टिकवता येते. नियमितपणे रिव्हिजन केल्यास अभ्यासक्रम पूर्णतः लक्षात राहतो. विशेषतः परीक्षेच्या काही दिवस आधी रिव्हिजन करणे अत्यंत आवश्यक असते.