भारतीय रेल्वेमध्ये काम करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही भारतीय रेल्वेमध्ये रोजगाराची संधी शोधत आहात तर ही संधी खास तुमच्यासाठी आहे. या भरती बद्दल जाणून घेण्यासाठी, हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचावा. मुळात, भारतीय रेल्वेच्या या भरती प्रक्रिया संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांना अर्ज करण्यासाठी एका महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. दरम्यान, तो कालावधी येत्या काही दिवसात समाप्तीला येणार आहे. 12 ऑक्टोबर 2024 या तारखेपासून रेल्वेच्या या भरतीला सुरुवात करण्यात आली होती. तर इच्छुक असलेला उमेदवारांना नोव्हेंबरच्या 11 तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे.
हे देखील वाचा : NHB च्या ‘या’ भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत उद्यापर्यंत; लवकर करा अर्ज
जर तुम्ही भारतीय रेल्वेच्या ग्रुप डी पदांसाठी काम करण्यास इच्छुक आहात तर या भरतीचा नक्कीच लाभ घ्यावा, तसेच या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचावा. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करायचे आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहीर अधिकृत अधिसूचनेचा नक्कीच आढावा घ्यावा. अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. सामान्य श्रेणीतून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 500 रुपये भरायचे आहेत. तर इतर आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 250 रुपये भरायचे आहेत. महत्त्वाची बाब अशी आहे की परीक्षेस उपस्थित राहिलेल्या उमेदवारांना अर्ज शुल्कातील काही रक्कम रिफंड करण्यात येईल. परीक्षेत उपस्थित राहिलेल्या सामान्य श्रेणीतून येणाऱ्या उमेदवारांना 400 रुपये रिफंड करण्यात येईल.
भारतीय रेल्वेच्या संदर्भात असलेल्या भरतीमध्ये काही अटी-शर्टी उमेदवारांना पात्र करावे लागणार आहेत. जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत अधिसूचनेमध्ये या अटी शर्ती नमूद आहेत. उमेदवारांना त्या पात्र करणे गरजेचे आहे, अन्यथा अर्ज करता येणार नाही. वया मर्यादे संदर्भात असलेल्या अटीनुसार, किमान 18 वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर जास्तीत जास्त 33 वर्ष असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
हे देखील वाचा : देशातील पेपर लीक थांबवण्यासाठी, सात सदस्यीय समितीने केल्या ‘या’ महत्वाच्या शिफारशी
आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना नियमांनुसार वयोमर्यादेत काही प्रमाणात सूट देण्यात येईल. अधिसूचनेमध्ये उमेदवाराच्या शिक्षणासंदर्भात अटी सुद्धा नमूद करण्यात आली आहेत. उमेदवारांना त्या पात्र करणे अनिवार्य आहे. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी अर्ज करता उमेदवार एसएससी उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रात आयटीआय प्रमाणपत्र असावे. ग्रुप डी पदासाठी ती भरती होणार असून उमेदवारांनी या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत अधिसूचनेचा आढावा घ्यावा. तसेच भरण्यात आलेल्या अर्जाच्या एखाद्या फॉर्म ची प्रत स्वतःकडे ठेवावे, जेणेकरून भविष्यामध्ये त्याचा वापर होईल.