फोटो सौजन्य - Social Media
भारतीय रेल्वेमध्ये काम करण्याची इच्छा बाळगणाऱ्या लोकांसाठी खासकरून कोकण विभागीय रेल्वेमध्ये नोकरीची संधी शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. हल्लीच कोकण रेल्वेकडून भरती प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले होते. सप्टेंबरच्या १६ तारखेपासून या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली होती. अनेक इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला होता. दरम्यान, ज्या इच्छुक उमेदवारांना या अर्ज प्रक्रियेचा लाभ घेता आला नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
हे देखील वाचा : रेल्वेमध्ये रोजगाराची उत्तम संधी; १०वी पास करा अर्ज, RRC ची बंपर भरती
आनंदाची गोष्ट अशी आहे कि अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. आधी उमेदवारांना ७ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करता येणार होते. आता ही अंतिम तारीख ऑक्टोबरच्या २१ तारखेवर ढकलण्यात आली आहे. ज्यामुळे, ज्या उमेदवारांची अर्ज करण्याचे राहून गेले आहे, त्यांना या वाढीला दिवसांत अर्ज करता येणार आहे आणि कोकण रेल्वेच्या भरती प्रक्रियेत सहभाग घेता येणार आहे.
कोकण रेल्वेने एकूण १९० पदांसाठी या भरती प्रक्रियेला सुरुवात केली होती. या भरतीमध्ये सीनियर सेक्शन इंजिनीयर (Civil)च्या पदासाठी ५ जागा शिल्लक आहेत. तर स्टेशन मास्टरच्या पदासाठी १० जागा रिक्त आहेत. तसेच Electrical विभागातील सीनियर सेक्शन इंजिनीयरच्या ५ जागांचा विचार या भरतीमध्ये केला जाणारा आहे. तसेच गुड्स ट्रेन मॅनेजर आणि कमर्शियल सुपरवायजरच्या पदासाठी प्रत्येकी ०५ जागा रिक्त आहेत. Electrical विभागातील टेक्निशियनच्या पदासाठी १५ तर Mechanical विभागातील टेक्निशियनच्या पदासाठी २० जागा रिक्त आहेत. पॉइंट्समन पदासाठी ६० पदे, ट्रॅक मेंटेनर-I पदासाठी ३५ पदे तसेच असिस्टंट लोको पायलट पदासाठी १५ जागा आणि ESTM-III (S&T) पदासाठी १५ जागा अशा एकूण १९० जागांचा विचार या भरती प्रक्रियेमध्ये केला जाणार आहे.
हे देखील वाचा : अभियांत्रिकी क्षेत्रातील उमेदवारांसाठी भरतीची सुवर्णसंधी; HURL मध्ये अर्ज प्रक्रियेला सुरुवात
या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना किमान १८ वर्षे ते कमाल ३६ वर्षे आयु असणे अनिवार्य आहे. तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना काही प्रमाणात सूट देण्यात आले आहे. अर्ज करताना उमेदवारांना ८८५ रुपयांचे अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.