फोटो सौजन्य - Social Media
हिंदुस्तान उरवारक अँड रसायन लिमिटेड (HURL) ने भरतीच्या प्रक्रियेला सुरूवात केली आहे. अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये करिअर करू पाहणाऱ्या उमेदवारांना या भरतीचा लाभ घेता येणार आहे. जर तुमचे शिक्षण अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये झाले आहे आणि तूम्ही नोकरीच्या शोधात आहात तर नक्कीच या संधीचा लाभ घ्या. HURL ने अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये पदवीधर तसेच डिप्लोमा धारक असलेल्या उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे. या भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. 1 ऑक्टोबर 2024 पासून उमेदवारांनी या भरतीमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, या भरती सबंधित अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. या अधिसूचनेमध्ये या भरती सबंधित सखोल माहिती पुरवण्यात आली आहे. भरतीमध्ये सहभाग घेण्यासाठी अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्यागोदर या अधीसुचनेचा आढवा घ्यावा.
हे देखील वाचा : IRDAI Assistant Manager परीक्षेची तारीख झाली जाहीर; ‘या’ लिंकवरून पाहता येईल प्रवेशपत्र
HURL ने आयोजीत केलेल्या या भरती प्रक्रियेत 212 रिक्त पदांचा विचार केला जाणार आहे. यातील 67 रिक्त जागांसाठी अभियांत्रिकी क्षेत्रातील पदवीधरांची नियुक्ती केली जाणार आहे. तर रिक्त 145 जागांसाठी अभियांत्रिकी क्षेत्रातील डिप्लोमा धारकांची निवड केली जाणार आहे. उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी hurl.net.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
भरतीसाठी अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांनी काही अटी शतींची पात्रता करणे अनिवार्य आहे. या अटी शर्ती वयोमर्यादे तसेच शिक्षणाच्या संदर्भात आहेत. वर सांगितल्याप्रमाणे, उमेदवार अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये पदवीधर किंवा डिप्लोमा धारक असावा. पदवीधर उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 30 वर्षे निच्छित करण्यात आले आहे. तर डिप्लोमा धारकांचे किमान वय 18 वर्षे निश्चित करण्यात आले आहे, तर जास्तीत जास्त 27 वर्षे वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. नियमानुसार, आरक्षिक प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेत काही प्रमाणात सुत देण्यात येईल.
हे देखील वाचा : ‘करा घरबसल्या शिलाई, होईल चांगली कमाई’; महिलांसाठी उत्तम संधी, त्वरित करा अर्ज
उमेदवारांना 21 ऑक्टोबर 2024 या तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे. या तारखेच्या आत उमेदवारांनी अर्ज करण्यात यावे असे आवाहन HURL ने केला आहे. अर्ज करण्यासाठी तसेच अर्ज करण्याअगोदर अधिसूचनेचा आढावा घेण्यासाठी उमेदवारांनी HURL च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.