पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी! एलआयसी हाऊसिंग फायनान्समध्ये 'या' पदासाठी मोठी भरती!
एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ सहाय्यक पदाच्या एकूण 200 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 असणार आहे.
संस्था : हाऊसिंग फायनान्स लिमिटेड
भरले जाणारे पद : कनिष्ठ सहाय्यक
पद संख्या : 200 पदे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 ऑगस्ट 2024
नोकरीचे करण्याचे ठिकाण : संपूर्ण भारत
आवश्यक शैक्षणिक पात्रता
1. उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 जुलै 2024 रोजी 21 ते 28 वर्षे असावे.
परीक्षा फी : 800 रुपये अधिक 18 टक्के जीएसटी
मिळणारे वेतन : 32,000 ते 35,200 रुपये दरमहा
अशी होणार निवड
1. ऑनलाइन परीक्षा
2. मुलाखत
अधिक माहितीसाठी जाहिरात वाचा : https://www.lichousing.com/static-assets/pdf/Detailed_Advertisement_Recruitment_of_Junior_Assistants_2024.pdf?crafterSite=lichfl-corporate-website-cms&embedded=true
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे किल्क करा : https://www.shorturl.at/
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.lichousing.com/ ला भेट द्या.