
फोटो सौजन्य - Social Media
राज्यातील पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पद महत्त्वाचे असून त्याला मोठी प्रतिष्ठा आहे. सामान्यतः पीएसआय पद मिळवण्यासाठी उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेद्वारे सरळ सेवा घेतात. परंतु, स्पर्धा परीक्षेत यश मिळाले नाही, तर सेवेतील पोलीस शिपायांना विभागीय परीक्षेद्वारे पीएसआय पद मिळवण्याची संधी असते. आता राज्य शासनाने पुन्हा एकदा मर्यादित विभागीय परीक्षा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, सेवेतील पोलीस शिपायांना पीएसआय पदावर जाण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
पुढील नियमानुसार पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील पदे भरण्यात येणार आहेत:
मर्यादित विभागीय परीक्षेसाठी पात्र उमेदवार:
पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले कर्मचारी
शैक्षणिक पात्रता: