Indigo bird strike flight: नागपूरहून कोलकाताकडे निघालेल्या इंडिगो विमानाला पक्षी धडकल्याने काही मिनिटांतच २७२ प्रवाशांना सुखरूप नागपूरला उतरवण्यात आले. या विमानाने आज सकाळी ७ वाजून ५ मिनिटाने उड्डाण घेतली होती.
पुढील 24 तासांसाठी राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 4 सप्टेंबरपर्यंत मुसळधार सरी बरसतील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
कर्जत तालुक्यात रस्त्यांच्या बाजूने पाइपलाइन किंवा केबल टाकण्याची कामे सर्रास होत असतात. त्यात कोणी आवाज उठवला तर राजकीय नेत्यांचे फोन येतात आणि ती बेकायदा कामे अव्याहतपणे सुरूच असतात.
दैनिक नवभारत वृत्तपत्र समूहाच्या दैनिक नवराष्ट्र साेलापूरच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘आयकॉन सोलापूर’ पुरस्कार सोहळा येथील हिराचंद नेमचंद वाचनालयातील किर्लोस्कर सभागृहात झाला.
महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील सोनापूर तांडा गावात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. ३५ वर्षीय विजय राठोडला त्याच्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे.
सातनवरीचे समृद्ध गावाचे रोल मॉडेल उभारून लवकरच राज्याच्या प्रत्येक तालुक्यातील 10 गावे स्मार्ट व इंटेलिजंट करण्यत येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
शासनाची संस्थात्मक बांधणी करताना नाविन्यपूर्ण आणि सातत्याने केलेल्या बदलांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने सज्ज असले पाहिजे. प्रशासनाने लोकाभिमुख सेवा वाढविल्या तरच शासनाचे उत्तरदायित्व वाढेल.
मुंबईत घर खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA ) ने कोकण बोर्ड लॉटरी २०२५ साठी अर्ज करण्याची तारीख वाढवली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सतनवारीला देशातील पहिले स्मार्ट गाव म्हणून घोषित केले आहे. हे गाव नागपूरमध्ये आहे. येथे फायबर-ऑप्टिक इंटरनेट, एआय-आधारित कृषी अॅप्स आणि ड्रोन तंत्रज्ञान आहे.
देशातील पहिले ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय म्हणून ओळख असलेल्या अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे रूपांतर आदर्श शासकीय संस्थेमध्ये करण्यात यावे असे सांगण्यात आले.
हिंजवडीकडे हाय प्रायोरिटीने लक्ष घालावे. अन्यथा गणपतीनंतर आम्ही नागरिकांसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करू,” असा इशारा खासदार सुळे यांनी राज्य सरकारला दिला आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना देखील 26 ऑगस्टला पगार देण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. एसटी कर्मचाऱ्यांना देखील गणेशोत्सवानिमित्त 26 ऑगस्टला पगार दिला जाणार आहे.
अधिकृत समितीचं नाव “नौपाडा आणि कोपरी प्रभाग समिती” असतानाही त्या पत्रकातून ‘कोपरी’ हा शब्द पुसून टाकण्यात आला. हा प्रकार उघड होताच कोपरीकरांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
भाजपा व शिंदे गटाच्या प्रभावाखाली ही प्रभाग रचना केली गेल्याचा स्पष्ट आरोप ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख समीर भगवान यांनी केला. याबाबत ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला इत्यंभूत माहिती देणारे पत्र देण्यात येणार…
ढोल-ताशा पथकांतील वादकांनी काळजी कशाप्रकारे घ्यावी, कोणता व्यायाम करावा आणि कोणता आहार घ्यावा याबद्दल अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. विनायक देंडगे यांनी सविस्तर माहीती दिली.
मोटार वाहन निरीक्षकपदी पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांच्या गणवेशावर नव्या पदाचे चिन्ह लावून पदभार स्वीकारण्याचा समारंभ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे आयोजित करण्यात आला.