Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MBBS Admission 2026: MBBS-BDS प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट

MBBS Admission 2026: वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. MBBS आणि BDS अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज नोंदणीची मुदत वाढवण्यात आली असून, विद्यार्थ्यांना १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे. प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी २५ ऑगस्ट २०२६ रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 14, 2026 | 06:22 PM
MBBS-BDS प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट

MBBS-BDS प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट

Follow Us
Follow Us:
  • वैद्यकीय एमबीबीएस व बीडीएसच्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ
  • अर्ज नोंदणीची अंतिम तारीख १५ ऑगस्ट २०२६
  • पहिली गुणवत्ता यादी दिनांक २५ ऑगस्ट २०२६ रोजी जाहीर होणार
नीता परब, मुंबई: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेशासाठी वैद्यकीय शिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या वैद्यकीय एमबीबीएस व बीडीएस या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या नोंदणीस ६ ऑगस्ट पासून सुरुवात झाली होती व या अभ्यासक्रमाच्या प्रवेश नोंदणीची अंतिम तारीख १२ ऑगस्ट होती. या प्रवेश नोंदणीला १५ ऑगस्ट रात्री ८.०० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याची पहिली गुणवत्ता यादी २५ ऑगस्ट जाहीर करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी २०२६ मध्ये नीट मध्ये पात्र झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी करावी असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे. आतापर्यंत ३३ हजार ९४९ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली असल्याचे सीईटी कक्षाकडून सांगण्यात आले आहे. (MBBS Admission 2026)

‘मेडिकल समुपदेशन समिती’ने अखिल भारतीय कोट्याच्या प्रवेशासाठी असलेल्या जागांसाठी प्रवेशाच्या नोंदणीला दिलेल्या मुदतवाढीच्या पार्श्वभूमीवर, राज्य ‘सीईटी कक्षाने राज्याच्या कोट्यातील वैद्यकीय एमबीबीएस व बीडीएस या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या नोंदणीस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे व ही मुदतवाढ १५ ऑगस्ट रात्री ८.०० पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यानुसार केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियाच्या वेळापत्रकात सुधारणा करण्यात आली आहे.

PRIF: शिक्षणापासून नोकरीपर्यंतची नवी वाट; तरुणांसाठी ‘पीआरआयएफ’चा प्रयत्न

एमबीबीएस व बीडीएसच्या अभ्यासक्रमासाठी २०२६ मध्ये जे विद्यार्थी नीट या प्रवेश परीक्षेमध्ये पात्र झाले आहेत, ते विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी करण्यास पात्र आहेत. विद्यार्थ्यांनी पोर्टलवर सर्व मूळ आवश्यक कागदपत्रांची रंगीत स्कॅन केलेली प्रत अपलोड करण्यात यावी. तसेच कागदपत्र पडताळणीसाठी विद्यार्थ्यांनी सर्व मूळ कागदपत्रासह पडताळणी केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.

दिव्यांग विद्यार्थ्यांनी वैद्यकीय मंडळाने जारी केलेले दिव्यांग पात्रता प्रमाणपत्र सादर करावे. तसेच इडब्ल्यूएसचा दावा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी वैध असलेले इडब्ल्यूएसचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. आरक्षण प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र जे आवश्यक आहे ते सादर करणे आवश्यक आहे. ओबीसी व एसईबीसी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी झाल्यापासून सहा महिन्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

वैद्यकीय प्रवेशासाठी यावर्षी नवीन बदल

सर्व कागदपत्रे अपलोड करणे अत्यावश्यक अन्यथा प्रवेश अर्ज रद्द करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी पोर्टलवर सर्व मूळ आवश्यक कागदपत्रांची रंगीत स्कॅन केलेली प्रत अपलोड करणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यात अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदणीच्या अंतिम तारखेच्या आधी सर्व कागदपत्रे काढून ठेवणे आवश्यक आहे.

संस्थात्मक फेरीच्या जागा सीईटी कक्ष ऑनलाईन भरणार

कॅपमध्ये शिल्लक राहिलेल्या जागा व संस्थाच्या असलेल्या जागा पूर्वी या संस्थास्तरावर भरल्या जात असत. यावर्षी या सर्व जागा सीईटी कक्ष ऑनलाईन पद्धतीने भरणार आहे.

एमबीबीएस/बीडीएस अभ्यासक्रमाच्या कॅप फेरीचे-१ प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक

१.प्रवेशासाठी संकेतस्थळावर अर्जाची ऑनलाईन नोंदणी-
६ ते १५ ऑगस्ट रात्री ८.०० पर्यंत

२.ऑनलाईन पेमेंट गेटवेद्वारे नोंदणी शुल्क भरणे.
(शुल्क यशस्वीपणे भरल्यानंतरच उमेदवाराला प्रक्रियेसाठी नोंदणीकृत मानले जाईल.)-
६ ते १५ऑगस्ट
रात्री १०.०० पर्यंत

३.पोर्टलवर सर्व मूळ आवश्यक कागदपत्रांची रंगीत स्कॅन केलेली प्रत अपलोड करणे.

(आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यात अपयशी ठरलेल्या उमेदवारांचा दावा केलेल्या श्रेणीतील प्रवेश प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही)
६ ते १५ ऑगस्ट
रात्री ११ .५९ पर्यंत

४. ऑनलाईनद्वारे दस्तऐवज पडताळणी
७ ते १७ ऑगस्ट

५.नोंदणीकृत विद्यार्थ्यांच्या अस्थायी गुणवत्ता यादींची प्रसिद्धी –१८ ऑगस्ट

६.अंतिम गुणवत्ता यादीची प्रसिद्धी-२१ ऑगस्ट

७. ऑनलाईन पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया
२२ ते २४ ऑगस्ट
सायंकाळी ५.३० पर्यंत

८.पहिली जागावाटप यादीची प्रसिद्धी —-२५ ऑगस्ट

IIT Delhi AI Course: AI क्षेत्रात करिअरची संधी! IIT Delhiच्या नव्या कोर्सेससाठी असा करा अर्ज

Web Title: Mbbs bds admission registration deadline extended august 15 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 06:21 PM

Topics:  

  • MBBS
  • NEET

संबंधित बातम्या

Paper Leak: लातूरचे रुग्णालय अन् नीट पेपर फुटीचे कनेक्शन! सीबीआयकडून मोठा गौप्यस्फोट; विद्यार्थ्याच्या उत्तराने खळबळ!
1

Paper Leak: लातूरचे रुग्णालय अन् नीट पेपर फुटीचे कनेक्शन! सीबीआयकडून मोठा गौप्यस्फोट; विद्यार्थ्याच्या उत्तराने खळबळ!

NEET PG 2026 च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षा सिटी स्लिप कधी आणि कशी डाउनलोड करावी? जाणून घ्या सविस्तर!
2

NEET PG 2026 च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षा सिटी स्लिप कधी आणि कशी डाउनलोड करावी? जाणून घ्या सविस्तर!

Education Secretary: उच्च शिक्षण विभागाच्या नवीन सचिवपदी दीप्ति गौर मुखर्जी यांची नियुक्ती; जाणून घ्या कोण आहेत त्या!
3

Education Secretary: उच्च शिक्षण विभागाच्या नवीन सचिवपदी दीप्ति गौर मुखर्जी यांची नियुक्ती; जाणून घ्या कोण आहेत त्या!

डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहताय? परदेशातील ‘या’ ५ प्रमुख देशांमधून MBBS केल्यानंतर भारतात थेट मिळेल प्रॅक्टिस करण्याचा अधिकार!
4

डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहताय? परदेशातील ‘या’ ५ प्रमुख देशांमधून MBBS केल्यानंतर भारतात थेट मिळेल प्रॅक्टिस करण्याचा अधिकार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.