फोटो सौैजन्य: iStock
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेक जण नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असतात. काही जणांना लगेच नोकरी मिळते तर काही जण इंटरव्ह्यू देतच राहतात. अशावेळी जर नोकरी मिळत नसेल तर नैराश्य सुद्धा येऊ शकते. यावेळी काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे.
आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे अनेक नोकरीसाठी इंटरव्ह्यू देतात, परंतु प्रत्येक वेळी अपयशी ठरतात. तुम्हीही इंटरव्ह्यू दिल्यानंतर प्रत्येक वेळी निराश होत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो.
चांगली नोकरी मिळवण्यासाठी तुमचा फक्त बायोडाटा चांगला असणे गरजेचे नाही, तर इंटरव्ह्यू दरम्यान अनेक गोष्टी लक्षात ठेवणे सुद्धा गरजेचे आहे. इंटरव्ह्यू देताना अनेक वेळा आपण काही चुका करतो ज्यामुळे आपले सिलेक्शन होत नाही. अशा परिस्थितीत आपण त्या चुका ओळखून त्यांची पुनरावृत्ती थांबवणे महत्वाचे आहे.
या चुकांमध्ये अप्रामाणिकपणा आणि खोटे बोलणे यासारख्या स्पष्ट चुकांपासून ते वर्तणुकीपर्यंतच्या चुका आहेत. ज्याची तुम्हाला कदाचित जाणीवही नसेल. या चुकांना कॉर्पोरेट जगतात ‘Red Flags Of Interview’ म्हणतात. या चुका ओळखून तुम्ही एक चांगली नोकरी मिळवू शकता.
इंटरव्ह्यूमधील सर्वात मोठा रेड फ्लॅग अप्रामाणिकपणा असू शकतो. अशा परिस्थितीत, तुमच्या ऑनलाइन प्रोफाइलमध्ये तुमची प्रोफेशनल इमेज अशी असावी जी इंटरव्ह्यू दरम्यान दिसणाऱ्या तुमच्या व्यक्तिमत्त्वाशी तंतोतंत जुळेल. यासाठी बायोडाटा, सोशल मीडिया आणि इंटरव्ह्यू दरम्यान दिलेली माहिती सारखीच असल्याची खात्री करा. तुमच्या स्किल्सबद्दल खरे सांगा.
वाद घालणे, नकारात्मक देहबोली किंवा इंटरव्ह्यू दरम्यान उशीरा येणे यासारखे वर्तन तुमच्या सिलेक्शनची शक्यता कमी करू शकते. अशा परिस्थितीत, दिलेल्या वेळेत इंटरव्ह्यूला या आणि सकारात्मक देहबोली ठेवा.
हे देखील वाचा: EPFO मध्ये भरतीची संधी; परीक्षा देण्याची गरज नाही, ‘या’ आधारावर होणार भरती
कोणत्याही इंटरव्ह्यूला जाताना पूर्ण तयारी करा. तयारी न करता इंटरव्ह्यूला आल्याने तुम्ही चिंताग्रस्त किंवा अज्ञानी वाटू शकता. तुमचे स्किल्स आणि कंपनीच्या उद्दिष्टांबद्दल जाणून घ्या. तुमच्या संबंधित अनुभवाची उदाहरणे तयार करा. हे तुमची कमिटमेंट आणि प्रोफेशनलिज्म दर्शवते.
इंटरव्ह्यूच्या वेळी तुम्ही ज्या कंपनीसाठी काम करत आहात त्यावर कधीही टीका करू नका. त्याऐवजी, तुम्ही तिथे काय शिकलात आणि आव्हानात्मक परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्ही घेतलेल्या पुढाकारांबद्दल बोला. हा दृष्टिकोन तुमची क्रिएटिव्हिटी आणि दूरदृष्टी दर्शवेल.