Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई महापालिका लिपीक पदभरती: 1846 जागांच्या भरतीसाठी सुधारित जाहिरात, ‘या’ अटी केल्या रद्द

मुंबई महानगरपालिकेकडून लिपिक पदासाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात येत आहे. या पदाच्या तब्बल 1846 जागांसाठी भरतीप्रकिया राबिवली जात आहे. या संबंधी मुंबई महापालिकेनेअटी रद्द केल्या आहेत. त्याचा इच्छुक उमेदवारांना फायदा होणार आहे. सुधारित जाहिरातीनुसार उमेदवारांना 11 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. जाणून घ्या याबाबत 

  • By नारायण परब
Updated On: Sep 23, 2024 | 03:10 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई महानगरपालिकेकडून कार्यकारी सहायक ( लिपिक) पदाकरिता 1846 जागांसाठी भरतीप्रकिया राबिवली जात आहे. या भरतीप्रक्रियेसंबंधी काही अटी रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांना याचा फायदा होणार आहे. नवीन जाहिरातीनुसार आता उमेदवारांना 11 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

या अटी रद्द करण्यात आल्या 

  • महापालिकेच्या भरतीप्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांसाठी दहावी आणि पदवी परीक्षा ही पहिल्या प्रयत्नात उतीर्ण होण्याची अट ठेवण्यात आली होती. प्रथम प्रयत्नात उतीर्ण होण्याची अट रद्द करण्याची मागीण सर्व स्तरातून केली जात होती. त्यावर पालिकेने निर्णय घेत ही अट रद्द केली आहे.
  • या अटीसोबतच पदवी परीक्षेत 45 टक्के गुणांसह उत्तीर्ण होण्याची अट ठेवली होती. ती अटही रद्द करण्यात आली आहे.

महापालिकेकडून सुधारित अर्हतेनुसार अर्ज मागविण्यात आले आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना आता 11 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. याआधी पात्र उमेदवारांनी अर्ज केले असतील तर त्यांना अर्ज करण्याची गरज नाही.

वयोमर्यादा

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी- किमान 18 ते 38 वर्षे

राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी- किमान 18 ते 43 वर्षे

अर्ज शुल्क (वस्तू व सेवाकरासह)

खुला प्रवर्ग – 1000 रुपये

राखीव प्रवर्ग- 900 रुपये

वेतन

निवड झालेल्या उमेदवारांना 25500 रुपये ते 81100 रुपये दरमहा वेतन असणार आहे.

शैक्षणिक पात्रता

  • इच्छुक  उमेदवार हा मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा  उत्तीर्ण असावा.
  • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा.
  • सहभागी होणार उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
  • उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.
  • उमेदवाराजवळ ‘एम.एस.सी.आय.टी’ परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र किंवा शासन निर्णय केलेल्या संगणक /माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचानलयाने यासंदर्भात यापुढे वेळोवेळी निर्गमित केलेल्या व बृहन्मुंबई महानगरपालिकेने अंमलात आणलेल्या परिपत्रकातील तरतुदी लागू होतील.
  • उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम, वर्ड प्रोसेसिंग, खेडशिट, प्रेझेंटेशन, डेटाबेस सॉफ्टवेअर, ई-मेल आणि इंटरनेट इत्यादीविषयी उत्तम ज्ञान असावे.

अर्जप्रक्रिया

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती भरा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोंबर 2024 पर्यंत असणार आहे. अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरातीची पीडीएफ काळजीपूर्वक वाचावी.

अर्जासंबंधी सुधारित जाहिरातीकरिता इथे क्लिक करा 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा – https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32839/90687/Index.html

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.mcgm.gov.in/ ला भेट द्या.

 

Web Title: Mumbai municipal clerk recruitment revised advertisement for recruitment of 1846 vacancies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2024 | 03:10 PM

Topics:  

  • BMC
  • government jobs

संबंधित बातम्या

शिक्षणाचा आगळा-वेगळा उमटविला ठसा, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षणाधिकारी सुजाता खरेंची किमया
1

शिक्षणाचा आगळा-वेगळा उमटविला ठसा, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षणाधिकारी सुजाता खरेंची किमया

Is Essel World permanently shut down? एस्सेल वर्ल्ड कायमचं बंद झालं का? जाणून घ्या त्यामागची खरी कहाणी
2

Is Essel World permanently shut down? एस्सेल वर्ल्ड कायमचं बंद झालं का? जाणून घ्या त्यामागची खरी कहाणी

Government Jobs: सरकारी नोकरी ईच्छुकांसाठी खुश खबर! तब्बल ७ हजार पदांसाठी भरती जाहीर, असे करू शकतात अर्ज
3

Government Jobs: सरकारी नोकरी ईच्छुकांसाठी खुश खबर! तब्बल ७ हजार पदांसाठी भरती जाहीर, असे करू शकतात अर्ज

Mumbai: दहिसर-भाईंदर कोस्टल रोडचा मार्ग मोकळा; तीन वर्षांत प्रवास अर्ध्या तासावर; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
4

Mumbai: दहिसर-भाईंदर कोस्टल रोडचा मार्ग मोकळा; तीन वर्षांत प्रवास अर्ध्या तासावर; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.