Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषदेच्या कार्यशाळेचे आयोजन! मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते होणार उदघाटन

मुंबईत १९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या NCVET-SEEID कार्यशाळेत कौशल्य, रोजगार आणि उद्योजकतेविषयी महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 18, 2025 | 07:19 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण परिषद (NCVET) आणि महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नवोन्मेष विभाग (SEEID) यांच्या संयुक्त विद्यमाने पश्चिम विभागीय क्षमतावृद्धी व जनजागृती कार्यशाळेचे आयोजन १९ सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात आले आहे. ही कार्यशाळा मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे सकाळी ९.३० वाजता सुरू होऊन सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालणार आहे. उद्घाटन सोहळा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते होणार आहे.

बँकिंग क्षेत्रातील IBPS प्रिलिम्स परीक्षेचा निकाल होणार जाहीर! अशा प्रकारे करता येईल चेक

देशातील तरुणांना रोजगाराभिमुख शिक्षण व प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, तसेच त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करणे हा राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण परिषदेचा (NCVET) प्रमुख उद्देश आहे. यासोबतच व्यावसायिक अभ्यासक्रमांना मान्यता, मूल्यांकन व योग्य मार्गदर्शन देण्याचे कार्य देखील परिषद करते. या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार, केंद्रीय कौशल्य विकास विभागाच्या सचिव देबश्री मुखर्जी, NCVET च्या कार्यकारी सदस्य डॉ. विनीता अग्रवाल, संचालक गुंजन चौधरी, राज्याच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याशिवाय महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दमण-दीव तसेच दादरा-नगर हवेली येथील प्रतिनिधी आणि विविध भागधारक देखील सहभागी होणार आहेत.

या कार्यशाळेत DVET संस्था अधिक सक्षम आणि प्रभावी करण्यासाठी उपाययोजना चर्चिली जाणार असून, NCVET च्या नियामक भूमिकेवरही सखोल चर्चा होईल. राज्यस्तरीय कौशल्य विकास उपक्रम, मानके व गुणवत्ता हमी, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ग्रीन हायड्रोजन यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांवरील प्रशिक्षण, अवार्डिंग बॉडीज व मूल्यमापन संस्थांची नोंदणी व कार्यपद्धती, विविध कौशल्य उपक्रमांचे एकत्रीकरण तसेच शालेय व उच्च शिक्षण व्यवस्थेत व्यावसायिक शिक्षणाचा समावेश या विषयांवर विशेष सत्रे आयोजित करण्यात आली आहेत.

दिसायला जणू अभिनेत्री! सोशल मीडियाची स्टार… IPS अधिकारी अंशिकाची यशोगाथा 

दिवसभर चालणाऱ्या या कार्यशाळेत भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयातील मान्यवर, महाराष्ट्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी आणि राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण परिषदेचे पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. या उपक्रमातून रोजगारक्षम पिढी घडवण्यासाठी आवश्यक दिशादर्शन होणार असून, व्यावसायिक शिक्षण व कौशल्य विकास क्षेत्राला नवे बळ मिळणार आहे.

Web Title: National council for vocational education and training workshop organized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2025 | 07:19 PM

Topics:  

  • Mangalprabhat Lodha

संबंधित बातम्या

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिदिनानिमित्त मुंबईत पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव! मंत्री मंगलप्रभात लोढा यांची संकल्पना
1

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिदिनानिमित्त मुंबईत पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव! मंत्री मंगलप्रभात लोढा यांची संकल्पना

कबुतरे वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वपूर्ण निर्णय, पर्यायी व्यवस्था होईपर्यंत खाद्यपुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश
2

कबुतरे वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वपूर्ण निर्णय, पर्यायी व्यवस्था होईपर्यंत खाद्यपुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश

मंत्री लोढा म्हणतात,”स्टार्टअप ही लोकचळवळ झाली पाहिजे…” टेक वारी’त २४ नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे सादरीकरण
3

मंत्री लोढा म्हणतात,”स्टार्टअप ही लोकचळवळ झाली पाहिजे…” टेक वारी’त २४ नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे सादरीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.