फोटो सौजन्य - Social Media
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) कडून PO/MT प्राथमिक (प्रिलिम्स) परीक्षा 2025 चा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. अनेक उमेदवार या वर्षी मोठ्या संख्येने बँकिंग क्षेत्रात करिअर घडवण्याच्या उद्देशाने IBPS परीक्षेला पात्र करण्याच्या तयारीत आहेत. देशभरातील हजारो उमेदवार या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ही परीक्षा १७ ऑगस्ट, २३ ऑगस्ट आणि २४ ऑगस्ट 2025 रोजी घेण्यात आली होती. परीक्षेत एकूण १०० वस्तुनिष्ठ प्रश्न होते, ज्यांना १०० गुणांची मर्यादा होती. इंग्रजी भाषा ( (English language), परिमाणात्मक क्षमता (quantitative ability) आणि तार्किक क्षमता (logical ability) असे तीन विभाग यात समाविष्ट होते.
प्रत्येक विभागात उमेदवारांनी किमान गुण मिळवणे आवश्यक आहे, तेव्हाच त्यांना ऑनलाईन मुख्य परीक्षा (Mains) देण्याची पात्रता मिळते. या परीक्षेतील निवड पद्धती अत्यंत कठीण असल्यामुळे केवळ वेग, अचूकता आणि संकल्पनांची स्पष्टता असणारे उमेदवारच पुढील टप्प्यात पोहोचू शकतात.
IBPS ने यामध्ये निगेटिव्ह मार्किंग ठेवलेली आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातात. त्यामुळे प्रश्न सोडवताना उमेदवारांनी काळजीपूर्वक विचार करून उत्तर द्यावे लागले. यामुळेच ही परीक्षा आणखी आव्हानात्मक ठरली आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांनी आपले स्कोअरकार्ड डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो कराव्यात:
उमेदवारांना सल्ला देण्यात येतो की, निकालासंबंधी आणि पुढील मुख्य परीक्षा प्रक्रियेबाबत अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवावे.
या निकालामुळे अनेक उमेदवारांच्या बँकिंग करिअरचा पुढील टप्पा निश्चित होणार असून, यशस्वी उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी सज्ज व्हावे लागणार आहे.