फोटो सौजन्य - Social Media
नॅशनल एलिजिबिलिटी कम इन्ट्रन्स टेस्ट (NEET) ची परीक्षा ऑगस्टच्या ११ तारखेला आयोजित केली गेली असून परीक्षेला उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र पाहता आणि डाउनलोड करता येणार आहे. NEET PG 2024 परीक्षा देशभरात विविध सेंटर्स वर आयोजित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी natboard.edu.in तसेच nbe.edu.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. या लिंकवरून विदयार्थी त्यांचे प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतात.
NEET PG EXAM 2024 चे आयोजन ११ जुलै २०२४ रोजी करण्यात आले असून देशभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी या परीक्षेसाठी उपस्थित राहणार आहेत. NEET PG EXAM 2024 ला दोन शिफ्ट मध्ये विभागले गेले आहे. विशेष म्हणजे एकाच दिवशी एकच सेक्शन घेण्यात येणार असल्याची बातमी समोर आली आहे. NEET PG EXAM 2024 पूर्णरीत्या संगणकावर आधारित असणार आहे. यात विद्यार्थ्यांना तब्बल २०० MCQs चा सामना करावा लागणार आहे. सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्याला साडे ३ तासाचा वेळ दिला जाणार आहे. एकूण ३:३० तासात विद्यार्थ्याला संपूर्ण परीक्षा द्यावी लागणार आहे. मह्त्वाची बाब म्हणजे, परीक्षा देण्याची भाषा फक्त इंग्रजी असणार आहे. कोणत्याही स्थानीय भाषेत परीक्षा देता येणार नाही आहे. त्यामुळे विद्यार्थ्याने इंग्रजी भाषेत सक्षम असणे आवश्यक आहे.
अशा प्रकारे NEET 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल
प्रत्येक उमेदवाराने प्रवेशपत्रावरील माहिती काळजीपूर्वक वाचावी. जर त्यात काही त्रुटी असतील तर त्वरित संकेतस्थळावर संपर्क साधावा. प्रवेशपत्रावरील सूचना काळजीपूर्वक वाचावी आणि अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्या.