
फोटो सौजन्य - Social Media
भांडुप पश्चिम येथे ही वास्तू उभारण्यात येणार असून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुस्तके तसेच शांत जागा मिळवून देण्याचा हेतू यामागे दिसून येत आहे. दिवंगत कामगार नेते आणि माजी आमदार दिना बामा पाटील यांच्या जयंतीनिमित्त वाचनालयाचा तसेच अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. स्थानिक शिवसेना विभाग प्रमुख रमेश कोरगावकर यांच्या हस्ते लोकापर्ण सोहळा पार पडला.
भांडुपच्या जंगल मंगल रोड परिसरात मानवी वस्ती आहे आणि स्थानिकांकडून नेहमी एका वाचनालयाची मागणी करण्यात येत होती. अनेक वर्षांपासून येथील स्थानिकांच्या या मागणीचा प्रश्न प्रलंबित होता. तो प्रश्न सोडवण्यात यश आले आहे. सर्व सुविधांनी सज्ज अशी वाचनालयाची ही भव्य इमारत त्यांच्या अनेक शैक्षणिक गरजा पूर्ण करणारी ठरणार असल्याचे आश्वासन स्थानिक बड्या नेत्यांकडून देण्यात आले आहे. ही इमारत विद्यार्थ्यांसाठी मोठी दिलास्याची बाब असल्याचे निष्कर्षणात येत आहे. याची ग्वाही उदघाटनादरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांचा स्मित चेहराच देत होता.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान खिळले होते तसेच स्मित होते. या वाचनालयात सर्व प्रकारचे पुस्तके ठेवण्यात येणार आहे तसेच अनेक प्रकारचे संदर्भ साहित्यदेखील विद्यार्थ्यंसांठी उपल्बध करण्यात येतील. हा येथील स्थानिकांसाठी मोठा शैक्षणिक लाभ आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील स्थानिकांनी या वास्तूचा लाभ घ्यावा असे सांगण्यात आले आहे. प्रतिष्ठान तसेच खासदार निधीच्या माध्यमातून भांडुप पश्चिम येथे हे वाचनालय तसेच अभ्यासिकेची भव्य वास्तू बांधण्यात आली आहे.