
फोटो सौजन्य - Social Media
शिक्षण पूर्ण झालेय किंवा शिकत आहात? कामाची संधी शोधात आहात? तर आता टेन्शन घ्याच कारण नाही. NITI आयोगाने इच्छुक उमेदवारांना नोकरीची संधी दिली आहे. तुमच्या करिअरला किक देण्यासाठी ही संधी फार फायद्याची ठरणार आहे. मुळात, प्रशिक्षणार्थी म्हणून जरी निवड होईल तरी याचा लाभ पुरेपूर घेता येणार आहे. कारण मोफत काम करायचे नसून त्यासाठी उमेदवारांना स्टायपेंड पुरवण्यात येणार आहे. एकूण ६ महिन्यांसाठी ही इंटर्नशिप मिळणार आहे. या इंटर्नशिपसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.
या इंटर्नशिपमध्ये विद्यार्थ्यांना अनेक महत्त्वाच्या कामांचा अनुभव घेता येईल. फायली, डॉक्युमेंट्स हाताळणे, थेट प्रोजेक्ट्सवर काम करणे, पॉलिसी ड्राफ्टिंग (धोरण तयार करणे) यासारख्या गोष्टी शिकण्याची उत्तम संधी मिळेल. त्यामुळे ज्यांना सरकारी क्षेत्रात, पॉलिसी मेकिंगमध्ये किंवा प्रशासनाशी संबंधित करिअर करायचे आहे, त्यांच्यासाठी ही इंटर्नशिप फारच उपयुक्त ठरणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत
ही इंटर्नशिप अनपेड म्हणजेच विनामूल्य आहे. नीती आयोगाकडून कोणतेही मानधन किंवा मासिक भत्ता दिला जाणार नाही. मात्र, कामाचा प्रत्यक्ष अनुभव, प्रतिष्ठित संस्थेचे नाव व भविष्यातील करिअरमध्ये उपयोगी पडणारा अनुभव हे फायदे विद्यार्थ्यांना नक्की मिळतील. 12वी पास झालेले विद्यार्थी किंवा कॉलेजमध्ये शिकत असलेले विद्यार्थी नीती आयोगाच्या या इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात. 10 ऑक्टोबर 2025 ही शेवटची तारीख आहे. सरकारी पॉलिसी व प्रशासकीय कामांचा अनुभव घ्यायचा असल्यास ही एक सुवर्णसंधी ठरू शकते.