फोटो सौजन्य - Social Media
जर तुम्ही दहावी उत्तीर्ण आहात आणि नोकरीच्या शोधात आहात तर टेन्शन नॉट! आजच्या काळात दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी शोधणे फार कठीण झाले आहेत. पण जर तुमच्यामध्ये महाराष्ट्र राज्याबाहेर जाऊन काम करण्याची तयारी असेल तर ही भरती खास तुमच्यासाठी आहे. या भरतीची विशेष गोष्ट म्हणजे ही भरती विशेष दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आहे.
हरियाणा सरकारच्या Skill Development and Industrial Training Department ने दहावी पास उमेदवारांसाठी अॅप्रेंटिसशिपच्या संधी जाहीर केल्या आहेत. या भरतीत हरियाणा सरकारच्या विविध विभाग, बोर्ड, कॉर्पोरेशन आणि कार्यालयांमध्ये उमेदवारांना प्रशिक्षु म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून, उमेदवारांनी अधिकृत पोर्टलवर नोंदणी करून अर्ज सादर करावा लागेल.
अधिसूचना जाहीर झाल्यापासून उमेदवारांना अर्ज सुरू करण्याची संधी १ ऑक्टोबर २०२५ पासून मिळाली आहे, तर अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ ऑक्टोबर २०२५ आहे. या भरतीसाठी अर्ज फी लागू नाही, त्यामुळे सामान्य, OBC, SC, ST किंवा EWS कोणत्याही वर्गातील उमेदवारांना अर्ज करताना कोणतीही फी भरावी लागत नाही. अॅप्रेंटिस पदासाठी उमेदवारांनी किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि वयमर्यादा १५ ते २९ वर्षांदरम्यान असावी. भरतीसाठी निवड प्रक्रिया शॉर्टलिस्टिंग, अॅप्टिट्यूड टेस्ट, दस्तऐवज पडताळणी आणि अंतिम निवड या टप्प्यांमध्ये पार पडेल.
उमेदवार अर्ज करण्यासाठी अधिकृत पोर्टल www.apprenticeshipindia.gov.in वर जाऊन नोंदणी करून आपली प्रोफाइल तयार करावी. इच्छित ट्रेड आणि विभाग निवडल्यानंतर अर्ज १७ ऑक्टोबर २०२५ च्या आत सबमिट करणे आवश्यक आहे. भविष्यासाठी अर्जाची कॉपी जतन करून ठेवावी, जेणेकरून पुढील संदर्भासाठी उपयोग होईल. ही भरती दहावी पास उमेदवारांसाठी विशेष संधी मानली जाते. १८ वर्षांपासून वय असलेल्या युवकांसाठी सरकारी क्षेत्रात काम करण्याचा अनुभव मिळवण्याचा हा सुवर्णसंधीचा मार्ग आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करून संधीचा लाभ घेणे अत्यावश्यक आहे.