फोटो सौजन्य - Social Media
NTPC लिमिटेड, भारतातील सर्वात मोठी वीज कंपनी, उपव्यवस्थापक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि कंट्रोल अॅन्ड इन्स्ट्रुमेंटेशन (C&I) या तीन शाखांसाठी असून, या माध्यमातून अनुभवी उमेदवारांना प्रतिष्ठित राष्ट्रीय ऊर्जा प्रकल्पात काम करण्याची संधी मिळणार आहे. NTPC ही सरकारी क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी असून, ऊर्जा निर्मितीत तिचे मोठे योगदान आहे.
जाहिरात क्रमांक 10/25 अंतर्गत एकूण 120 पदांसाठी ही भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 26 मे 2025 पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 जून 2025 आहे. सर्व अर्ज फक्त अधिकृत वेबसाइटवर careers.ntpc.co.in किंवा ntpc.co.in च्या “Careers” विभागातून ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरावी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
या भरतीसाठी वयोमर्यादा 18 ते 40 वर्षांदरम्यान निश्चित करण्यात आली आहे. वयाची गणना 9 जून 2025 या तारखेआधारे केली जाणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमांनुसार वयात सवलत दिली जाईल. NTPC उपव्यवस्थापक भरती प्रक्रियेत उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंगच्या आधारे होणार आहे. त्यानंतर मुलाखत, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी असे टप्पे असणार आहेत. भरती प्रक्रियेतील पारदर्शकता आणि गुणवत्तेचा उच्च दर्जा राखण्यासाठी NTPC विशेष लक्ष देत असते.
उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या सूचनांचे पालन करून अर्ज सादर करावा. चुकीची माहिती भरल्यास किंवा कागदपत्रे अपूर्ण असल्यास अर्ज फेटाळला जाऊ शकतो. NTPC मध्ये काम करण्याची ही एक मोठी संधी असून पात्र उमेदवारांनी ती नक्कीच साधावी. या भरतीसंदर्भात अधिक माहितीसाठी जाहीर अधिसूचनेचा आढावा घ्यावा. तसेच संकेतस्थळावर Visit करावे.