फोटो सौजन्य - Social Media
ऑइल इंडिया लिमिटेडने भरतीला सुरुवात केली आहे. या भरतीच्या प्रक्रियेतून ग्रेड A, ग्रेड B आणि ग्रेड D च्या पदासाठी उमेदवारांना नियुक्त केले जाणार आहे. भरतीमध्ये एकूण १०० पेक्षा ही जास्त पदांना भरण्यात येणार असून अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी ऑइल इंडिया लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.
या भरतीसाठी शैक्षणिक निकष निश्चित करण्यात आले आहेत. अभियांत्रिकी, वित्त, मानव संसाधन, आयटी, कायदा, भूगर्भशास्त्र या शैक्षणिक क्षेत्रातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तर काही पदांसाठी ICAI, ICSI, MBA, PGDM या क्षेत्रातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अधिक माहितीसाठी अधिसूचनेचा वाचून काढा. वयोमर्यादेसंबंधित अटी पाहिल्या तर ग्रेड C पदासाठी ३७ वर्षे आयु निश्चित करण्यात आली आहे. ग्रेड B पदासाठी ३४ वर्षे तर ग्रेड A पदासाठी ४२ वर्षे आयु निश्चित करण्यात आली आहे. काही आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना (SC/ST – ५ वर्षे, OBC – ३ वर्षे, अपंग – १० वर्षे, माजी सैनिक – ५ वर्षे ) सूट आहे.
उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून काही रक्कम भरावी लागणार आहे. सामान्य/OBC प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ₹५०० + GST भरावी लागणार आहे. SC/ST/PWD/EWS/माजी सैनिक प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज शुल्क माफ आहे. नियुक्तीच्या प्रक्रियेमध्ये CBT परीक्षा घेण्यात येणार असून याला पात्र करणाऱ्या उमेदवारांना मुलाखत द्यावी लागणार आहे.
जर तुम्ही अर्ज करण्यास इच्छुक आहात तर खाली दिलेल्या टप्प्यांना फॉलो करा: