ऑनलाईन कामातून भरघोस कमाईची संधी, शिक्षण घेत असताना करता येणार Part Time Jobs
वयोगट 18 ते 25 मधील तरुण शिक्षणासाठी आणि कामानित्ताने मुंबई येतात. अनेकांना इथे येऊन जेवणापासून ते राहण्यासकट सगळ्याचा संघर्ष करावा लागतो. मात्र आता तंत्रज्ञान प्रगत होत जात आहे, त्यामुळे काही कंपनी वर्क फ्रॉम होमची सुविधा देतात. जर तुमच्याकडे देखील काही स्कील्स असतील तर तुम्ही देखील पार्ट टाईम जॉब करुन घरबसल्या पैसे कमवू शकता. जाणून घेऊयात अशा काही पार्ट टाइम जॉबबद्दल..
काही जण शिक्षणासाठी घरापासून लांब शहरात येऊन राहतात. त्यामुळे रोजचा खर्च निघण्यासाठी पार्ट टाइम जॉबची करतात. सध्याच्या डिजीटल युगात सोशल मीडियाच्या वापरामुळे कधीही आणि कुठेही राहून ऑफिसचं काम करता येणं सोपं झालं आहे. असे काही पार्ट टाईम जॉब आहेत जे काम तुम्ही कधीही आणि कुठेही बसून करु शकता.
तुम्ही जक कंटेंट रायटर असाल किंवा तुम्हाला लिहीण्याची आवड असेल तर या तुमच्या कौशल्यावर तुम्ही घरबसल्या कमवू शकता. त्याचबरोबर व्हिडीओ एडीटींग, ट्रांसलेशन, फोटोग्राफी, मार्केटिंग, सोशल मीडिया मॅनेजमेंट यांसारखं काम तुम्ही घरबसल्या देखील करु शकता. यामध्ये तुम्ही कामानुसार पैसे कमवू शकता.
आजच्या काळात शैक्षणिक क्षेत्रातदेखील झपाट्याने बदल होत आहेत. सध्या ऑनलाईन क्सासेस देखील घेतले जातात. या ऑनलाइन क्लासेसची मागणी दिवसेंदिवस वाढत जात आहे. जर तुम्हालाही मुलांना शिकवण्याची आवड असेल किंवा तुम्हाला माहिती सांगायला आवडत असेल तर तुम्ही ऑनलाइन क्लासेस देखील घेऊ शकता. तसंच स्पर्धा परिक्षा किंवा कुठल्याही महत्त्वाच्या विषयावर माहिती देणं आवडत असेल तर तुम्ही युट्यूब चॅनेल सुरु करु शकता. मिळणाऱ्या माहितीच्या आधारे काही जण ऑनलाइन क्लासेसच्या माध्यमातून तासाला 200 ते 1500 रुपये सहज मिळवतात.
जर तुम्हाला कथा, कविता लिहायला आवडत असेल तर तुम्ही तुमच्या कथा बेवसाईटवर देखील लिहू शकता. स्वत:चा ब्लॉग सुरु करुन तुमच्या कथांना वाचकांची पसंती मिळाली तर गुगलकडून चांगले पैसे देखील मिळतात.
तुम्ही जर गृहिणी असाल किंवा कॉलेज करत पार्ट टाइम जॉबच्या शोधात असाल तर तुम्ही डेटा एंट्रीचेही काम करु शकता. डेटा एंट्रीचं काम सहज आणि सोपं असतं त्यामुळे तुम्हाला कॉलेज करुन किंवा घरातील कामं सांभाळून देखील पैसै कमवता येतील.
बऱ्याच कंपन्या या त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट हॅंडल करण्यासाठी पार्ट टाईमवर कामाला घेतात. प्रत्येक प्रकारची कंपनी, मोठी किंवा लहान, त्यांची सोशल मीडिया खाती हाताळण्यासाठी व्यवस्थापक नियुक्त करते. फ्रीलान्सिंगसाठी हा एक चांगला पर्याय आहे.