फोटो सौजन्य - Social Media
इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनियर्सचे संचालक महासंचालनालय (DG EME) ने इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनियर्सच्या विभागामध्ये विविध ग्रुप C पदांसाठी 625 जागांसाठी भरतीची घोषणा केली आहे. ही थेट भरती भारतीय नागरिकांसाठी आहे, आणि अर्ज ऑफलाइन करावा लागेल. एकंदरीत, भारतातून या भरतीसाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करण्यास उत्सुक आहात तर नक्कीच हे लेख शेवटपर्यंत वाचा. या भरतीच्या संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांना याचा आढावा घेता येणार आहे.
आर्मी DG EME ग्रुप C अधिसूचना 28 डिसेंबर 2024 ते 3 जानेवारी 2025 च्या रोजगार वृत्तपत्रात प्रसिद्ध केली आहे. एकंदरीत, अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना डिसमेंबर २०२४ च्या २८ तारखेपासून या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तसेच अर्ज करण्याची मुदत १७ जानेवारी २०२५ पर्यंत असणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना काही पात्रता निकषांना पात्र असणे अनिवार्य आहे. या अटी शर्ती शैक्षणिक असून उमेदवारांच्या वयोमर्यादेसंदर्भात आहेत. किमान १८ वर्षे आयु असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तर जास्तीत जास्त २५ वर्षे आयु या भरतीसाठी निश्चित करण्यात आली आहे. सरकारी नियमांनुसार, आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेत काही प्रमाणात सूट देण्यात येईल.
अधिसूचनेमध्ये नमूद शैक्षणिक पात्रता निकषांनुसार, फार्मासिस्ट, इलेक्ट्रिशियन, वाहन यांत्रिक आणि इतर पदांसाठी ITI, डिप्लोमा किंवा 10+2 शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. तसेच उमेदवारांना LDC पदांसाठी 12 वी पास आणि टायपिंग स्पीड 35 wpm (इंग्रजी) किंवा 30 wpm (हिंदी) आवश्यक आहे. उमेदवारांच्या नियुक्तीसाठी लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. तसेच उमेदवारांच्या कौशल्यांची चाचणी घेण्यात येईल आणि शारीरिक चाचणी तपासण्यात येईल. कागदपत्राची पडताळणीसाठी उमेदवारांना उपथित राहावे लागणार आहे. लेखी परीक्षा २ तासांच्या कालावधीसाठी आयोजित केली जाईल. नियुक्तीसाठी उमेदवारांना या परीक्षेला उत्तीर्ण करावे लागणार आहे.
अशाप्रकारे करता येईल अर्ज: