Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पीएच.डी करणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के अधिछात्रवृत्ती मिळणार, विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे

 राज्य सरकारकडून  ओबीसी, एनटी, व्हीजे, आणि एसबीसी प्रवर्गातील पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के अधिछात्रवृत्ती देण्याचे महत्त्वपूर्ण आश्वासन  दिले गेले आहे. यामुळे महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

  • By नारायण परब
Updated On: Sep 23, 2024 | 10:03 PM
पीएच.डी करणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के अधिछात्रवृत्ती मिळणार, विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे
Follow Us
Close
Follow Us:

राज्य सरकारकडून  ओबीसी, एनटी, व्हीजे, आणि एसबीसी प्रवर्गातील पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के अधिछात्रवृत्ती देण्याचे महत्त्वपूर्ण आश्वासन  देण्यात आले आहे. या निर्णयानंतर विद्यार्थ्यांनी ‘महाज्योती’ मुख्यालयासमोर सुरू असलेले आंदोलन मागे घेतले आहे. मागील काही महिन्यांपासून महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (महाज्योती) विद्यार्थ्यांना सरसकट अधिछात्रवृत्ती मिळावी, या मागणीसाठी ओबीसी संशोधक विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. शासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

‘बार्टी’चा आदर्श

‘बार्टी’ संस्थेतील पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांसाठी यापूर्वीच १०० टक्के अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ‘बार्टी’च्या विद्यार्थ्यांनी राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात आंदोलन केले होते, ज्याची दखल घेत शासनाने ‘बार्टी’मधील ७६३ पीएच.डी. विद्यार्थ्यांना १०० टक्के अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेतला होता. याच धर्तीवर ‘महाज्योती’चे विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्या हक्कासाठी आंदोलन उभारले होते. या राज्य सरकारकडून दिलेल्या आश्वासनामुळे महाज्याेतीच्या विद्यार्थ्यांनाही सरसकट अधिछात्रवृत्ती मिळणार आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या:

महाज्योती संस्थेतर्फे २०२२ ते २०२३ या कालावधीत अर्ज मागवण्यात आले होते, ज्यामध्ये ८६९ विद्यार्थ्यांना पात्र ठरवले गेले होते. मात्र, विद्यार्थ्यांच्या मते त्यांना संपूर्ण अधिछात्रवृत्ती मिळाली पाहिजे, अशी त्यांची मागणी होती. शासनाने समान धोरण तयार करून अधिछात्रवृत्तीच्या निकषांनुसार सर्व विद्यार्थ्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका:

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी विद्यार्थ्यांच्या या मागणीला पूर्ण समर्थन दिले होते. त्यांनी महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांच्याशी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या मागण्यांची दखल घेण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे शासनाने अखेर विद्यार्थ्यांची मागणी मान्य केली आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे ओबीसी, एनटी, व्हीजे, आणि एसबीसी प्रवर्गातील पीएच.डी. विद्यार्थ्यांना संशोधनासाठी मोठी आर्थिक मदत होणार आहे. त्यांच्या अधिछात्रवृत्तीच्या समस्येचे निराकरण झाल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे, आणि शासनाचा अधिकृत निर्णय लवकरच लागू होणार आहे. बार्टीनंतर महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना आता १०० टक्के अभिछात्रवृत्ती दिली जाणार आहे.

Web Title: Phd obc students who do will get 100 percent scholarship students protest back

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2024 | 10:03 PM

Topics:  

  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Mangal Prabhat Lodha: पत्रकारांसाठी ‘एआय’चे….; काय म्हणाले मंत्री मंगल प्रभात लोढा?
1

Mangal Prabhat Lodha: पत्रकारांसाठी ‘एआय’चे….; काय म्हणाले मंत्री मंगल प्रभात लोढा?

Devendra Fadnavis: “भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी…”; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
2

Devendra Fadnavis: “भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी…”; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Elon Musk ला महाराष्ट्राची भुरळ! Starlink सोबत राज्य सरकारची पार्टनरशिप, अति दुर्गम भागातही इंटेटरनेट सेवा पोहोचणार
3

Elon Musk ला महाराष्ट्राची भुरळ! Starlink सोबत राज्य सरकारची पार्टनरशिप, अति दुर्गम भागातही इंटेटरनेट सेवा पोहोचणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.