फोटो सौजन्य - Social Media
NEET PG म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (पोस्ट ग्रॅज्युएट) ही भारतातील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीची पात्रता परीक्षा आहे. नेशनल बोर्ड ऑफ एग्जामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) द्वारे ही परीक्षा ३ ऑगस्ट २०२५ रोजी देशभरात घेतली जाणार आहे. एम.डी., एम.एस., पीजी डिप्लोमा अभ्यासक्रमांसाठी ही परीक्षा अनिवार्य आहे.
परीक्षा सकाळी १०:०० ते दुपारी १:४५ या वेळेत घेण्यात येणार आहे. एकाच सत्रात ३ तास ३० मिनिटांची ही परीक्षा कम्प्युटर आधारित (CBT) पद्धतीने होईल. परीक्षार्थींनी सकाळी ८:०० वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे कारण बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन, फोटो ओळख, आयडी तपासणी अशा प्रक्रिया वेळखाऊ असतात.
ड्रेस कोडचे पालन अनिवार्य आहे. पुरुषांनी अर्धी बाह्यांची शर्ट/टी-शर्ट (जिप/पॉकेट नसलेली), स्त्रियांनी हलक्या रंगांचे, साधे कपडे परिधान करावेत. दागिने, बूट, घड्याळ यास मनाई आहे. केवळ स्लिपर/सँडल परवानगी आहेत.
परीक्षा केंद्रात सोबत काय न्यावे?
परीक्षेच्या आदल्या दिवशी ‘हे’ करा:
‘या’ चुका टाळा:
NEET PG परीक्षेसाठी २०० बहुपर्यायी प्रश्न असतील आणि ते काटेकोर निरीक्षणाखाली घेतले जातील. सर्व उमेदवारांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. परीक्षेच्या तयारीसाठी आता वेळ उरलेला नाही. म्हणूनच योग्य नियोजन आणि शांत मन हेच यशाचे खरे गमक ठरेल.