'या' सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात मोठी प्राध्यापक भरती; 'ही' आहे अर्जासाठी शेवटची मुदत!
तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठी भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 असणार आहे.
संस्थेचे नाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जालना
रिक्त असलेले पद
1. प्राध्यापक
2. सहयोगी प्राध्यापक
एकूण रिक्त पद संख्या : 44 पदे
(फोटो सौजन्य : istock)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
कुठे पाठवाल अर्ज?
अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना जिल्हा सामान्य रुग्णालय आवार, बायपास रोड, समर्थनगर जालना, पिन ४३१२१३
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 ऑगस्ट 2024
नोकरी करण्याचे ठिकाण : जालना
भरतीचा तपशील
प्राध्यापक : १७ पदे रिक्त
सहयोगी प्राध्यापक : २७ पदे रिक्त
कसा कराल अर्ज?
जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक पदाच्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वर दिलेल्या पत्यावर केवळ ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी. अर्ज सादर करण्याची शेवटची मुदत 09 ऑगस्ट 2024 असणार आहे. त्यापूर्वीच अर्ज पाठवावेत. नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही. असे महाविद्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी जाहिरात वाचा : https://drive.google.com/file/d/148ED8pFZvqfKfJ4sMwjH-n3uIO6pM7NZ/view?pli=1
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://jalna.gov.in/en/ ला भेट द्या.