Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाचव्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींची अभिमानास्पद कामगिरी! पटकावले सुवर्ण पदक

पाचव्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या मुलींनी पदकांची लयलूट करत देशभरात आपला दबदबा दाखवला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 26, 2025 | 04:44 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • १५८ किलो वजन उचलत सुवर्णाची कमान
  • शिवाजी विद्यापीठाची विद्यार्थीनी
  • मयूर सिहासने आणि डॉ. प्रशांत पाटील यांचे काटेकोर मार्गदर्शन
राजस्थानमध्ये सुरू असलेल्या पाचव्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या मुलींनी आपल्या दमदार खेळीची छाप पाडत पदकांची लयलूट केली. देशभरातील अव्वल खेळाडूंमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी केलेली ही धमाकेदार कामगिरी राज्यासाठी अभिमानाची ठरली आहे. या स्पर्धेत सर्वाधिक चर्चेत राहिली ती सांगलीतील काजोल सनगरची. चहाचा गाडा चालविणाऱ्या महादेव सनगर यांची मुलगी असलेल्या काजोलने परिस्थितीच्या सीमा मोडून काढत वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकत प्रेरणादायी उदाहरण घडवले. ४८ किलो गटातील स्पर्धेत काजोलने एकूण १५८ किलो वजन उचलत सुवर्णाची कमान केली. स्नॅच प्रकारात मोठी आघाडी घेत तिने सुरुवातीपासूनच आपली विजयी लय दाखवली. दुसऱ्या प्रयत्नात ७३ किलो तर क्लीन अँड जर्कमध्ये ८५ किलो वजन उचलून तिने पहिल्या क्रमांकावर शिक्कामोर्तब केले.

जॉब ALERT : सरकारी व बँकिंग क्षेत्रातील मोठ्या भरत्या सुरू, पाच हजारांहून अधिक पदांसाठी अर्ज करा

कला शाखेत दुसरे वर्ष शिकणारी काजोल ही शिवाजी विद्यापीठाची विद्यार्थीनी असून तिच्या या यशामागे प्रशिक्षक मयूर सिहासने आणि डॉ. प्रशांत पाटील यांचे काटेकोर मार्गदर्शन लाभले आहे. खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेतलं हे तिचं पहिलंच सुवर्ण, आणि त्यामुळे या विजयाची किंमत आणखीनच मोठी ठरते. आर्थिक अडचणी, मर्यादित साधनसामग्री आणि तगडा स्पर्धात्मक माहोल हे सर्व अडथळे पार करत काजोलने दाखवून दिले की जिद्द, शिस्त आणि मेहनत असेल तर मोठं यश दूर नसतं.

काजोलसोबतच सायकलिंगमध्येही महाराष्ट्राची आणखी एक छाप पडली. आहिल्यानगरच्या अपूर्वा गोरे हिने जयपूर येथील महिलांच्या वैयक्तिक टाइम ट्रायल स्पर्धेत कांस्यपदक पटकावत महाराष्ट्राचा अभिमान वाढवला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारी अपूर्वा ही २०२२ मधील खेलो इंडिया युवा स्पर्धेतील रूपेरी विजेती आहे. त्या यशानंतर दोन वर्षांनी पुन्हा पदकाची कमाई करत तिने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीची नवी नोंद केली आहे. या स्पर्धेत गुरु नानक देव विद्यापीठाच्या मीनाक्षी रोहिलाने सुवर्णपदक मिळवले.
खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेचे हे पाचवे पर्व राजस्थानमधील सात शहरांमध्ये रंगते आहे. देशभरातील २२२ विद्यापीठांचे तब्बल ४,४४८ खेळाडू २३ पदक स्पर्धांमध्ये उतरले असून स्पर्धेचं वातावरण अत्यंत रंगतदार झालं आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पहिल्याच दिवशी प्रभावी कामगिरी करत विजयी वाटचाल कायम ठेवल्याने संघाचा आत्मविश्वासही अधिक वाढला आहे.

पाचवी आठवी शिष्यवृत्तीच्या परीक्षा लांबणीवर! जुना नियम पुन्हा लागू, परीक्षा रचनेत मोठा बदल

सामान्य कुटुंबातून आलेल्या काजोलने अत्यंत कठीण परिस्थितीतून क्रीडा प्रवास सुरू केला. घरातली आर्थिक ताणतणावाची परिस्थिती, साधनांची कमतरता, शिक्षण आणि सराव यांच्यातील ताळमेळ या सर्व अडचणींवर मात करत तिने सुवर्णपदक मिळवून दाखवले. तिची कथा ही केवळ क्रीडा यशाची नाही, तर हजारो मुलांसाठी प्रेरणा बनणाऱ्या चिकाटीची आणि स्वप्नांच्या पाठलागाची कहाणी आहे. काजोल आणि अपूर्वाच्या चमकदार कामगिरीमुळे खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींचा डंका अधिक जोरात वाजत असून आगामी दिवसांतही अशीच विजयी भरारी पाहायला मिळेल, अशी क्रीडाप्रेमींची अपेक्षा आहे.

Web Title: Proud performance of maharashtra girls in the 5th khelo india university games

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 04:42 PM

Topics:  

  • Shivaji University

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.