फोटो सौजन्य - Social Media
ही परीक्षा आधी ८ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आली होती. पण नंतर या परीक्षेच्या तारखेमध्ये बदल करण्यात आला आहे. आता शिष्यवृत्तीची परीक्षा २२ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आली आहे. हे बदल करण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्याच दिवशी घेण्यात येणारी सीटीईटी (CTET) परीक्षा! परीक्षेमुळे निर्माण होणारी अडचण टाळण्यासाठी ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या संबंधित परीक्षा परिषदेचे आयुक्त अनुराधा ओक यांच्याकडून प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले आहे.
अर्ज प्रक्रियेबाबत काही महत्वाच्या सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. या सूचनांमध्ये सांगण्यात आहे की अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक अनिवार्य असणार आहे. त्यामुळे विद्वत्तरठ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी. त्यानंतर अर्ज करताना बँक खाते क्रमांक अनिवार्य नाही. विद्यार्थी शिष्यवृत्तीपात्र ठरल्यास बँक खाते उघडून माहिती ऑनलाइन भरण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर असेल.
या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थी शिष्यवृत्तीपात्र ठरल्यास बँक खाते उघडून माहिती ऑनलाइन भरण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर असेल. जिल्हा परिषद/मनपा निधीतून अर्ज भरणाऱ्या शाळांनी शुल्क ३१ डिसेंबरपर्यंत जमा करणे आवश्यक आहे.






