
फोटो सौजन्य - Social Media
रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया देशातील जॉब देणारी एक प्रतिष्ठित कंपनी आहे. येथे नोकरीच्या संध्या अनेक आहेत, खासकरून सरकारी नोकऱ्या! जर तुम्ही भरतीच्या शोधात असाल तर आता जास्त विचार करण्याची गरज नाही. RBI ची ही भरती विशेषकरून तुमच्यासाठी आहे. अनेक उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करण्यास सुरुवातही केली आहे. या भरतीच्या माध्यमातून रिक्त असलेले एकूण ५०० पेक्षा अधिक जागा भरण्यात येतील. या भरतीच्या माध्यमातून ऑफिस अटेंडंट हे पद भरण्यात येणार आहे. मुळात, या भरतीसाठी नक्की कोणते काम करावे लागतील तसेच पगार किती मिळेल? या सर्व गोष्टींची एकूण सविस्तर माहिती या भरतीच्या माध्यमातून देण्यात आली आहे. देशातील विविध भागात ही संधी देण्यात आली आहे. अर्जाला सुरुवात झाली असून ४ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
एकूण ५७२ पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगार म्हणून २४,२५० मूळ रक्कम मिळणार आहे तर अंदाजित एकूण मासिक पगार ४६,०२९ रुपये इतका असाल. त्याचबरोबर नियुक्त उमेदवारांना १५% घरभाडे भत्तादेखील पुरवण्यात येईल. त्याचबरोबर विविध सुविधा जशा की वैद्यकीय सुविधा, नोकरी अपघात अलाऊन्स, फर्निशिंग भत्ता, ग्रुप व लाईफ इन्शुरन्स, वाहन विमा, प्रवास भत्ता, लेव्ह फेअर कन्सेशन, शिक्षण प्रतिपूर्ती, चष्मा आणि लेन्सचा खर्च देण्यात येईल.
RBI विषयी थोडक्यात माहिती
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ही देशाची मध्यवर्ती बँक असून तिची स्थापना १ एप्रिल १९३५ रोजी झाली. देशातील चलन व्यवस्थापन, बँकिंग प्रणालीवर नियंत्रण, आर्थिक स्थिरता राखणे तसेच सरकारची बँक म्हणून काम करणे ही RBI ची प्रमुख जबाबदारी आहे. देशाची आर्थिक घडी सावरून ठेवण्यात RBI ची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
RBI चे मुख्यालय मुंबई येथे असून देशभरात विविध प्रादेशिक कार्यालये कार्यरत आहेत. त्यामुळे या भरतीच्या माध्यमातून देशातील विविध राज्यांमध्ये उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. सुरक्षित नोकरी, आकर्षक पगार, नियमित बढती, तसेच निवृत्तीनंतरची हमी ही RBI मधील नोकरीची मोठी वैशिष्ट्ये आहेत.