फोटो सौजन्य - Social Media
अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. भारतीय हवाई दलाने (Indian Air Force – IAF) अग्निवीरवायु 2027 भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जाहीर केली असून, ऑनलाईन अर्ज प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या पात्र उमेदवारांना ही एक मोठी संधी मानली जात आहे.
भारतीय हवाई दलाने ही अधिसूचना 12 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ https://iafrecruitment.edcil.co.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 फेब्रुवारी 2026 असून, उमेदवारांनी अंतिम तारखेची वाट न पाहता वेळेत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अग्निवीरवायु 2027 भरतीसाठी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता तसेच वैद्यकीय व शारीरिक निकष ठरवण्यात आले आहेत.
वयोमर्यादा
या भरतीसाठी उमेदवारांचे कमाल वय 21 वर्षे असणे आवश्यक आहे. उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी 2006 ते 1 जुलै 2009 या कालावधीत झालेला असावा. ही वयोमर्यादा पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी समान आहे.
शैक्षणिक पात्रता
उमेदवाराने 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच,
भरती प्रक्रियेत वैद्यकीय आणि शारीरिक निकषांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे.
अग्निवीरवायु 2027 भरतीसाठी निवड प्रक्रिया विविध टप्प्यांत पार पडणार आहे.






