फोटो सौजन्य - Social Media
सेंट्रल वेअरहॉऊसींग कॉर्पोरेशन (CWS)ने भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. एकूण १७९ रिक्त जागांसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. या भरतीच्या माध्यमातून डिसेंबरच्या १४ तारखेपासून उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भात अधिक माहिती अधिसूचनेमध्येव नमूद आहे. १३ डिसमेंबर रोजी CWS ने अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. या अधिसूचनेत या भरती संदर्भांत सखोल माहिती नमूद आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारीख लक्षात घ्यावी. १२ जानेवारी २०२५ पर्यंत उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. संपूर्ण देशभरातून अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी cewacor.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. सामान्य क्ष्रेणीतून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून १,३५० रुपयांची रक्कम भरायची आहे. तसेच OBC आणि EWS या आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनादेखील अर्ज शुल्क म्हणून १,३५० रक्कम भरायची आहे. अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती या आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ५०० रुपयांची भरपाई करायची आहे. PwBD, ESM तसेच महिला उमेदवारांनदेखील अर्ज शुल्कात काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. त्यांना SC आणि ST या आरक्षित प्रवर्गाप्रमाणे अर्ज शुल्क म्हणून केवळ ५०० रुपयांची भरपाई करायची आहे.
चला तर मग या भरतीमध्ये असलेल्या पदांविषयी आणि त्यासाठी असलेल्या अटी शर्तींविषयी सखोल जाणून घेऊयात. एकंदरीत, या भरतीसाठी अर्ज करताना काही अटी शर्तीना पात्र करावे लागणार आहे.
मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी ४० जागा रिक्त आहेत. या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार MBA असावा. तसेच वयोमर्यादा २८ वर्षे आयु निश्चित करण्यात आली आहे. तसेच तंत्रज्ञान विभागात मॅनेजमेंट पदासाठी 13 जागा रिक्त आहेत. अर्ज करता उमेदवार संबंधित क्षेत्रामध्ये PG असावा तसेच वयोमर्यादा २८ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. अकाउंटंटच्या पदासाठी ०९ जागा रिक्त आहेत. पदासाठी बी.कॉम तसेच BA मध्ये पदवीधर असलेल्या उमेदवारांची आवश्यकता आहे. परंतु, उमेदवाराची आयु ३० वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
सुपरइंटेंडन्टच्या पदासाठी २२ जागा रिक्त आहेत. या पदासाठी कोणत्याही क्षेत्रात पदवीधर असणाऱ्या उमेदवारांची गरज आहे. या पदासाठी ३० वर्षे आयु निश्चित करण्यात आली आहे. या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जाहीर अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.