फोटो सौजन्य- प्रतिनिधी
मुलांना खेळातून शिक्षण देण्याबरोबरच अंगणवाडी ताईनी त्यांच्या आई होऊन शिक्षण दिले तर या मुलांना शिक्षणाची आवड निर्माण होईल, आणि हे काम रिलायन्स फाऊंडेशन च्या माध्यमातून सुरू झाले आहे. महाराष्ट्रात सुमारे ७०० अंगणवाडीतील १० हजार मुलांना असे शिक्षण देण्याच्या या उपक्रमाचे उद्घाटन आज कल्याण तालुक्यातील रायते येथे झाले असल्याचे एकात्मिक बालविकास विभागाचे आयुक्त कैलास पगारे यांनी जाहीर केले.
ठाणे जिल्ह्यात २४ अंगणवाडयांचे प्रातिनिधिक उद्घाटन
आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले, रिलायन्स फांऊंडेशन ने कोकण विभागात ठाणे जिल्ह्यात २४अंगणवाडया बांधण्यात आल्या आहेत, त्यांचे प्रातिनिधिक उद्घाटन तालुक्यातील रायते येथे शुक्रवारी झाले, या अंगणवाडीत खेळातून शिक्षण, दिले जाणार आहे. ग्रामीण भागात अंगणवाडयाचा प्रश्न गंभीर आहे, तरीही महापोषण मध्ये ठाणे जिल्हाने चांगले काम केले आहे. कुपोषण कमी झाले आहे, गरोदरपणात अंगणवाडी सेविका काळजी घेत असल्याने कुपोषण कमी होत आहे, पण तरीही पहिल्या एका तासात केवळ६८टक्के च महिला आपल्या बाळाला दुध पाजतात, हे गंभीर असल्याचे सांगून याकडे शासन विशेष लक्ष देत असल्याचे सांगितले.
आज अंगणवाडया उभ्या राहिल्या
यानंतर रायते पिंपळोली ग्रुपग्रामपंचायतीच्या सरपंच समिता सुरोशे या म्हणाल्या,आमच्या गावात अंगणवाडी बांधण्यासाठी जागा उपलब्ध होत नव्हती, मात्र माजी झेडपी सदस्यां जयश्री सासे यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे आज या अंगणवाडया उभ्या राहिल्या आहेत. तर अंगणवाडी सेविका सुंनदा पवार यांनी आपले अनुभव उपस्थितीतां समोर मांडले, जिजाऊ संघटनेच्या अस्मिता शिंगोळो यांनी रिलायन्स फाऊंडेशन ने केलेल्या कामाबद्दल कौतुक केलं. यावेळी रिलायन्स फांऊंडेशन च्या नुपूर बहल यांनी अंगणवाडी केंद्राविषयी माहिती दिली.
याप्रसंगी व्यासपीठावर डेप्युटी कमिशनर संगीता लोंढे, ठाणे जिल्हा परिषदेचे बालविकास विभागाचे संजय बागूल, संतोष भोसले, कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये,सरपंच समिता संतोष सुरोशी,सहाय्यक बीडिओ आर के गवारी, बालविकास अधिकारी, अर्चना पवार,तसेच या विभागाच्या मुख्य सेविका, विस्तार अधिकारी, रायते शाळेचे एस एस पाटील, अंगणवाडी सेविका,ग्रामसेवक राजाभाऊ सुरवसे, आदी मंडळी उपस्थित होते. तर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी, आदींनी परिश्रम घेतले.
रिलायन्स फाऊंडेशन
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून समावेशक भारताच्या त्यांच्या दृष्टिकोनात लक्षणीय योगदान देत आहे. संस्थापक अध्यक्षा श्रीमती नीता एम अंबानी यांच्या नेतृत्वाखाली, रिलायन्स फाउंडेशनची स्थापना २०१० मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या विविध परोपकारी उपक्रमांना चालना देण्यासाठी करण्यात आली. समूहाच्या प्रयत्नांनी भारतातील ५५,५५० हून अधिक गावे आणि अनेक शहरी ठिकाणी ७६ दशलक्षाहून अधिक लोकांच्या जीवनाला स्पर्श केला आहे.