Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IGI एअरपोर्टवर १४०० पदांसाठी भरतीला सुरुवात; दहावी व बारावी पास उमेदवार करू शकतात अर्ज

IGI एअरपोर्टवर 1400 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ग्राउंड स्टाफ व लोडर पदांसाठी दहावी व बारावी पास उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी जाहीर लेख वाचा.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 11, 2025 | 04:11 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. IGI Aviation Services Pvt. Ltd. ने 2025 मध्ये एकूण 1400 पदांसाठी भरती जाहीर केली असून, यात “एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ” आणि “लोडर” या पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी अधिकृत नोटिफिकेशन igiaviationdelhi.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असून, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 10 जुलै 2025 पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2025 आहे.

पावसाळी सुट्ट्या! राज्यातील काही भागांतील शाळा दीड महिना राहतील बंद

या पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी आहे. ग्राउंड स्टाफ पदासाठी उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण असावा. कोणत्याही बोर्डामधून बारावी उत्तीर्ण असलेले तसेच ITI किंवा त्याहून अधिक शिक्षण घेतलेले उमेदवारही पात्र आहेत. लोडर पदासाठी किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, हे पद फक्त पुरुष उमेदवारांसाठी खुलं आहे. खास बाब म्हणजे या भरतीसाठी कोणताही एव्हिएशन डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट बंधनकारक नाही, त्यामुळे फ्रेशर्सनाही संधी आहे. उमेदवार दोन्ही पदांसाठी पात्र असल्यास, दोन्ही पदांसाठी वेगवेगळे अर्ज सादर करू शकतात, मात्र त्यासाठी परीक्षा शुल्क स्वतंत्रपणे भरावे लागेल.

वयोमर्यादा बाबतीत, ग्राउंड स्टाफसाठी वय 18 ते 30 वर्षांदरम्यान असावे लागते, तर लोडर पदासाठी ही मर्यादा 20 ते 40 वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे. निवड प्रक्रियेअंतर्गत प्रथम उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा 90 मिनिटांची असेल आणि यामध्ये सामान्य ज्ञान, तर्कशक्ती, गणित, इंग्रजी (लोडरसाठी नाही) आणि विमानतळसंबंधी ज्ञानावर आधारित प्रश्न असतील. लेखी परीक्षेत कोणतीही निगेटिव्ह मार्किंग नाही. ग्राउंड स्टाफ पदासाठी लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पुढील टप्प्यात मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मात्र लोडर पदासाठी केवळ लेखी परीक्षेच्या आधारे निवड केली जाईल.

महत्वाची बातमी! पाचवी तसेच आठवी शिष्यवृत्तीचा निकाल जाहीर

पगाराच्या बाबतीत, ग्राउंड स्टाफला दरमहा ₹25,000 ते ₹35,000 तर लोडर पदासाठी ₹15,000 ते ₹25,000 इतका मासिक पगार दिला जाईल. ही भरती केवळ नोकरीची संधी नसून, उमेदवारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याचा अनुभव देणारी ठरेल. त्यामुळे ज्या उमेदवारांना विमानतळावर नोकरी करून स्वतःचं करिअर घडवायचं आहे, त्यांनी ही संधी नक्कीच मिळवावी.

Web Title: Recruitment for 1400 posts at igi airport has begun

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2025 | 04:11 PM

Topics:  

  • airport

संबंधित बातम्या

US Flights : अमेरिकेत विमानसेवा कोलमडली; हजारो फ्लाइट्स रखडल्या,1,000 हून अधिक रद्द
1

US Flights : अमेरिकेत विमानसेवा कोलमडली; हजारो फ्लाइट्स रखडल्या,1,000 हून अधिक रद्द

Hydroponic-Marijuana : अहमदाबाद विमानतळावर 8.9 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त, मुंबईतील नागरिकाला अटक
2

Hydroponic-Marijuana : अहमदाबाद विमानतळावर 8.9 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त, मुंबईतील नागरिकाला अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.