भविष्यात धाराशिव विमानतळ प्रादेशिक हवाई वाहतुकीचे महत्त्वाचे केंद्र (Regional Hub) म्हणून उभे राहील, असा ठाम विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.
धाराशिव विमानतळासह चार विमानतळ हस्तांतरणास मंजुरी देण्यात आली. या निर्णयानंतर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
दिल्लीचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि इतर विमानतळ त्यांच्या प्रवाशांना मोफत आणि सुरक्षित वाय-फाय देतात. भारतीय क्रमांक असलेले प्रवासी ओटीपी वापरून त्वरित कनेक्ट होऊ शकता, जाणून घ्या कसे?
गुवाहाटीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योजक अदानी यांच्या उपस्थितीत टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आले आहे. ईशान्य भारतातील कनेक्टिव्हिटी आता अधिक सोपी होणार असल्याचे दिसून येत आहे
चिकलठाणा, मुर्तीजापूर, मुकुंदवाडीतील ५६.२५ हेक्टर अर्थात १३९ एकरात हे विस्तारीकरण होणार आहे. यासाठी जमीनसंपादन व ५७८.४५ कोटी रुपये अशा खर्चास नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रशासकीय व वित्तीय मान्यता शासन निर्णयाद्वारे मिळाली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुद्द्यावरून गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरु आहे. विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
नवी मुंबईला आता अंतर्गत मेट्रो मिळणार आहे. सिडको मेट्रो लाईन ८ बांधणार आहे. ही मार्गिका नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडेल. नवी मुंबईत या मार्गिकेवर अकरा स्थानके…
देशभरातील विमानतळांबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे, देशातील अनेक एअरपोर्ट्सवर चेक-इन सिस्टिम प्रभावित झाली आहे. त्यामुळे एअरपोर्टसवर प्रवाशांचा मोठा खोळंबा झाल्याचे दिसून आले.
जगभरातील बहुतांश विमानतळ पुरुषांच्या नावाने ओळखले जातात, तर महिलांच्या नावावरचे विमानतळ अत्यंत कमी आहेत. भारतात 148 पैकी फक्त 2 आणि जगात सुमारे 18 विमानतळ महिलांना समर्पित आहेत.
विमानतळाची सुरक्षा आणि विस्तारीकरण यामुळे हा रस्ता बंद करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत होते. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी ग्रामस्यांनी दिला.
Indian woman harassed at Shanghai airport : पिमा म्हणाले की, एक छोटीशी वाहतूक प्रक्रिया 18 तासांच्या कठीण परीक्षेत बदलली. त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आणि त्याला पुढील उड्डाणे नाकारण्यात आली.
Nashik Airport Expansion : सिंहस्थ-कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामास कुंभमेळा विकास प्राधिकरणाने प्रशासकीय मान्यता दिली.
अमरावतीत विमानतळावरील मूलभूत सुविधांच्या अभावामुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागतोय.विमानतळ प्रशासनाविरोधात प्रवाशांचा प्रचंड रोष वाढत असताना पाहायला मिळत आहे.
Delhi Bomb Blast: इंडिगो एअरलाईनच्या तक्रार पोर्टलवर हा धमकीचा ईमेल आला होता. या ईमेलमध्ये केवळ दिल्लीच नव्हे, तर चेन्नई आणि गोवा येथील विमानतळांनाही लक्ष्य करण्याचा उल्लेख होता.
दिल्लीपाठोपाठ, मुंबई आणि उत्तर भारतातील अनेक विमानतळांवर तांत्रिक बिघाडामुळे गोंधळ निर्माण झाला. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ATC (एअर ट्रॅफिक कंट्रोल) सिस्टीममधील एका मोठ्या समस्येमुळे उड्डाण ऑपरेश
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) २० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दोन्ही रनवे (धावपट्ट्या) मान्सूननंतरच्या देखभाल-दुरुस्तीसाठी तात्पुरते बंद ठेवणार आहे.
विमानतळ होणार असल्याच्या चर्चेमुळे पुरंदर परिसरातील जमिनींचे भाव झपाट्याने वाढले आहेत. या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेत काहीजण विमानतळाच्या नावाखाली प्लॉट विक्री करत आहेत.
अदानी एंटरप्राइझेस लिमिटेडच्या उपकंपनीने आज इंटरग्लोब एंटरप्राइझेस कंपनी व एंटरप्राइज एआयमधील जागतिक अग्रणी एआयओएनओएससोबत धोरणात्मक कराराची घोषणा केली.
गेल्या काही दिवसांमध्ये पुरंदर विमानतळाचा वाद चव्हाट्यावर आलेला आहे. जमीन हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ज्यावेळेस जमीन मोजणी केली जात होती, त्यावेळेस सात गावातील शेतकऱ्यांनी या विमानतळाला कसून विरोध केला.