फोटो सौजन्य - Social Media
पावर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL)ने भरतीच्या प्रक्रियेला आयोजित केलेआहे. या भरतीच्या प्रक्रियेत ८०० पेक्षा जास्त रिक्त जागांचा विचार केला जाणार आहे. विविध पदांसाठी ही भरती आयोजली आहे. एकंदरीत, पावर ग्रीडमध्ये काम करू इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या भरतीमध्ये DTE, DTC , JOT (HR), JOT (F&A) तसेच Asst. Tr. (F&A) च्या रिक्त जागांसाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. विविध पदासाठी विविध अटी शर्ती जाहीर करण्यात आल्या आहेत. उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी या अटी शर्ती पात्र करणे अनिवार्य आहे. या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी त्या भरतीचा आढावा घेणे आवश्यक आहे. २१ ऑक्टोबर २०२४ रोजी या भरती संदर्भांत अधिरकृत अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे.
हे देखील वाचा : Google सह करा करिअरचा श्रीगणेशा! आजचा करा अर्ज ‘या’ स्पेशल इंटर्नशिपसाठी
उमेदवारांना २१ ऑक्टोबरपासून या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. काल रात्री १२ वाजल्यापासून अर्ज करण्याची विंडो सुरु करण्यात आली आहे. अनेक उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करण्यास सुरुवात देखील केली आहे. तर अद्याप अर्ज केले नसलेल्या परंतु अर्ज करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी १२ नोव्हेंबर २०२४ या तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरतीच्या निवड प्रक्रियेत उमेदवारांच्या नियुक्तीसाठी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा २०२५ मध्ये जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येईल.
या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. Asst. Trainee च्या पदासाठी अर्ज करण्यासाठी General, OBC, EWS या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना २०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर इतर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ३०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. SC, ST, PWD, ESM प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी निशुल्क अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज करता येणार आहे. अर्ज नोव्हेंबरच्या १२ तारखेपर्यंत करायचे आहे.
हे देखील वाचा : AI मुळे नोकऱ्यांवर येत आहे गदा ! मात्र ‘या’ क्षेत्रातील नोकऱ्यांवर होणार नाही कोणताही परिणाम
‘या’ चार टप्य्यांमध्ये करता येणार अर्ज