फोटो सौजन्य: iStock
गूगल ही एक अशी बलाढ्य कंपनी आहे जिने आज जगभरात मोठे नाव कमावले आहे. शोधलं मीडियावर नेहमीच गूगलच्या वर्कप्लेसचे विडिओ व्हायरल होत असतात. त्या वर्कप्लेसमधील सकारात्मकता, चांगली नोकरी आणि उत्तम पगारामुळेप्रत्येक तरुणाचे स्वपन असते की आपण एकदा तरी गूगलसोबत काम करावे.
हे देखील वाचा:नेव्हल रॅपर शिप यार्डमध्ये भरतीची संधी; २१० रिक्त जागांसाठी करता येणार अर्ज
जर तुम्ही सुद्धा तुमचे करिअर स्टार्ट करण्याच्या मार्वर आहात आणि गूगलसोबत तुम्हाला काम करायची आवड असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. गूगल कम्प्युटर विज्ञान क्षेत्रातील तरुणांना कंपनीसोबत काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करू देत आहे. गूगल या विध्यार्थ्यांना एक इंटर्नशिप ऑफर करणार आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग विंटर इंटर्न असे या इंटर्नशिपचे नाव आहे. गुगलने या इंटर्नशिपसाठी अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे. त्यांनी याची माहिती त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर दिली आहे. या माहितीनुसार, ही इंटर्नशिप जानेवारी 2025 पासून सुरू होईल जिचा कालावधी 22 ते 24 आठवडे असेल. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी त्यांची पात्रता तपासणे गरजेचे आहे.
या इंटर्नशिपमध्ये सहभागी होण्यासाठी, विद्यार्थ्यांनी त्यांच्या पदवीपूर्व, पदव्युत्तर किंवा कम्प्युटर सायन्स किंवा संबंधित क्षेत्रातील दुहेरी पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात असले पाहिजे. उमेदवाराला C, C++, Java, JavaScript, Python किंवा त्याच्या समकक्ष सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि कोडिंगचा अनुभव असणे गजरेचे आहे. पात्रतेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
गुगलद्वारे इंटर्नशिपसाठी निवडलेल्या उमेदवारांना भारतातील त्यांच्या पसंतीच्या कोणत्याही शहरात – बेंगळुरू, कर्नाटक, हैदराबाद, तेलंगणा येथे इंटर्नशिपची संधी दिली जाईल.