भारतीय रेल्वेमध्ये भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. जर तुम्ही या भरतीमध्ये अर्ज करण्यास इच्छुक आहात तर नक्कीच तुम्ही या सुवर्णसंधीचा लाभ घेऊ शकता. या भरतीच्या प्रक्रियेच्या माध्यमातून एकूण ३२,००० पदे भरण्यात येणार आहेत. या विशाल भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार आहे. तू,हि जर यासाठी इच्छुक आहात तर नक्कीच यासाठी अर्ज करण्यास सुरुवात करा. उमेदवारांना अर्ज २३ जानेवारी २०२५ पासून अर्ज करता येणार आहे. आरआरबी वाहतूक, अभियांत्रिकी, यांत्रिकी, इलेक्ट्रिकल, विज्ञान आणि तंत्रज्ञान या विभागांमध्ये उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे या क्षेत्रांमध्ये अनुभव असणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्वाच्या भरतीपैकी एक आहे.
अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. सामान्य प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी ५०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तसेच OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठीदेखील सारखी रक्कम निश्चित करण्यात आली आहे. पुढे, CBT परीक्षेत उत्तीर्ण राहणाऱ्या उमेदवारांना अर्ज ४०० रुपये रिफंड केले जातील. तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून २५० रुपये भरायचे आहे. EBC, ट्रान्सजेंडर आणि महिला उमेदवारांनादेखील अर्ज शुल्क करताना २५० रुपये भरावे लागणार आहे. CBT परीक्षेला उपस्थित राहणारे उमेदवारांना नंतर २५० रुपये रिफंड करण्यात येतील, याची नोंद उमेदवारांनी घेण्यात यावी.
अर्ज करताना उमेदवारांना काही पात्रता निकष पात्र करावे लागणार आहेत. या अटी शर्ती शैक्षणिक आहेत, तसेच उमेदवाराच्या वयोमर्यादे संदर्भात आहेत. चला तर मग जाणून घेऊयात संपूर्ण पात्रता निकष:
RRB ग्रुप D च्या या भरतीच्या प्रक्रियेत अर्ज करणारे उमेदवार एका ठरविक वयोगटातील निश्चित करण्यात आले आहेत. मुळात, किमान १८ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर जास्तीत जास्त २६ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भारतीप्रक्रियेत वयोमर्यादेमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात येईल. तर शैक्षणिक अटी शर्तीनुसार, या भरतीसाठी अर्ज कर्ता उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या संबंधित अधिक माहिती तुम्हाला अधिसूचनेमध्ये मिळून जाईल. अधिक माहितीसाठी जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.