भारतीय विमान प्राधिकरण (AAI) ने 28 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या भरती अधिसूचनेनुसार पदवीधर, डिप्लोमा, आयटीआय ट्रेड शिकाऊ पदांकरिता ( ॲप्रेंटिसशिप )197 जागांसाठी भरती जाहीर केल्या आहेत. जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत. त्यांनी नॅशनल ॲप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम (NATS) education.gov.in. पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करायचा आहे. 25 डिसेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरतीप्रक्रियेसाठी असलेल्या निवड प्रक्रियेमध्ये कागदपत्र पडताळणी, मुलाखती आणि वैद्यकीय तपासणी यांचा समावेश आहे.
AAIॲप्रेंटिसशिप भरती 2024
शिक्षण
वयोमर्यादा
या भरतीप्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या अर्जदाराचे वय हे किमान १८ वर्षे आणि कमाल २६ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
AAI शिकाऊ अर्ज 2024: अर्ज करण्याचे टप्पे
अर्ज शुल्क
AAI ॲप्रेंटिसशिप भरती 2024: स्टायपेंड
AAI 2024 भरतीप्रक्रिये अंतर्गत निवडलेल्या शिकाऊ उमेदवारांना एक वर्षाच्या प्रशिक्षण कालावधीत दर महा स्टायपेंड दिला जाणार आहे. तो स्टायपेंड विविध पदानुसार वेगवेगळा असणार आहे.
भारतीय विमान प्राधिकरण (AAI) बद्दल
भारतीय विमातळ प्राधिकरण (AAI) ची स्थापना ही 1995 मध्ये झाली. ही स्थापना भारतीय विमानतळ प्राधिकरण कायदा, 1994 द्वारे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अधिपत्याखाली करण्यात आली आहे. त्यामुळे हे प्राधिकरण एक वैधानिक संस्था आहे. AAI द्वारे भारतातील या भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे मुख्यालय हे नवी दिल्ली येथे आहे.
भारतीय विमान प्राधिकरण (AAI) कार्ये
AAI चे प्रमुख कार्य म्हणजे भारतीय प्रदेश आणि शेजारच्या महासागर क्षेत्राशी संबंधित असलेल्या हवाई क्षेत्रांवर हवाई वाहतूक व्यवस्थापन सेवा प्रदान करणे आहे.नागरी विमान वाहतूक पायाभूत सुविधांची इमारत, वर्धित, सेवा आणि व्यवस्थापन व्यवस्थापित केल्या जातात. ही संस्था CNS (कम्युनिकेशन नेव्हिगेशन सर्व्हिलन्स) देखील प्रदान करते . देशातील विमान वाहतूक पायाभूत सुविधांची निर्मिती, व्यवस्थापन, देखभाल आणि सुधारणा यासाठी एएआय ही संस्था जबाबदार आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ, देशांतर्गत विमानतळ, सीमाशुल्क विमानतळ आणि संरक्षण हवाई क्षेत्रांमधील नागरी एन्क्लेव्हचे व्यवस्थापन एएआय कडे असते.