फोटो सौजन्य - Social media
जर तुम्हाला इन्कम टॅक्स विभागामध्ये काम कर्णयंतची इच्छा आहे. तर नक्कीच तुमच्या स्वप्नांना आता उजाळा देण्याची वेळ आली आहे. भारतीय इन्कम टॅक्स विभागाने भरती प्रक्रिया आयोजित केली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये कँटीन अटेंडंट पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. एकंदरीत, या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेऊ पाहणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. केवळ २५ रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित केली आहे. त्यामुळे मोठया प्रमाणात स्पर्धेचे वातावरण तयार होत आहे. उमेदवारांनी सप्टेंबरच्या ८ तारखेपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे.
इन्कम टॅक्स विभागाने या भरती प्रक्रियेसंदर्भात ऑफिशिअल अधिसूचना जाहीर केली आहे. या अधिसूचनेमध्ये भरती प्रक्रियेबद्दलची सखोल माहिती पुरवण्यात आली आहे. त्यामुळे अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिसूचनेचा आढावा घ्यावा. या संदर्भातील अधिसूचना उमेदवारांना इन्कम टॅक्स विभागाच्या https://www.tnincometax.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल. एकंदरीत, अर्ज ऑनलाईन स्वरूपामध्ये भरायचे असल्याने इन्कम टॅक्सच्या या संकेतस्थळावरच अर्ज करता येणार आहे.
चेन्नई, पुडुचेरी मध्ये ग्रुप सी कँटीन अटेंडंट पदासाठी जरी ही भारतीय प्रक्रिया आयोजित केली गेली असली तरी संपूर्ण देशभरातील उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवू शकतात. एक्नाद्रित, या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला 18000-56900/- रुपये दरमाह वेतन म्हणून देण्यात येईल. एकूण २५ रिक्त पदांमध्ये १३ उमेदवार सामान्य श्रेणीतील, ०६ उमेदवार ओबीसी प्रवर्गातील, ०२ EWS प्रवर्गातील तसेच ०३ उमेदवार SC प्रवर्गातून निवडले जातील. ST प्रवर्गासाठी केवळ १ जागा रिक्त आहे.
हे देखील वाचा : असे करा वेळेचे नियोजन; जॉब तसेच शिक्षणामध्ये होईल सुसंगती
या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यासाठी उमेदवारांना काही अटी शर्ती पात्र करणे अनिवार्य आहे. या अटी शिक्षण तसेच उमेदवाराच्या आयु संबंधित आहे. अर्ज करण्यासाठी SSC उर्वरितन उमेदवार पात्र आहे. तर उमेदवाराचे किमान वय १८ तर कमाल वय २५ असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत काही प्रमाणात सूट देण्यात येईल. १ ऑक्टोबरला लिखित परीक्षेसाठी शॉर्टलिस्ट केलेल्या अर्जकर्ते उमेदवारांचे नाव घोषित केले जाईल. निवड प्रक्रियेमध्ये लिखित परीक्षा, दस्तऐवजांची पडताळणी तसेच वैद्यकीय चाचणी घेण्यात येईल. यामध्ये पात्र उमेदवारांचीच निवड केली जाईल.