फोटो सौजन्य - Social Media
महाविद्यालयीन अभ्यास करताना बहुतेक मुले नोकरी करतात. जास्तकरून पदवीयुत्तर शिक्षण घेताना अनुभव घेण्यासाठी बहुतेक विद्यार्थी शिक्षणाबरोबर नोकरी करतात. या काळामध्ये अनुभव घेण्यावर मुले जास्त लक्ष देतात. पदवीयुत्तर शिक्षण घेताना कामाच्या ठिकाणी अनुभव मिळवणे फार महत्वाची गोष्ट असते. अनुभव मिळवण्यासाठी आता केलेले पर्यंत विद्यार्थ्यांचे भविष्य उजाळण्यासाठी फार महत्वाचे असते. परंतु, या वेळेत विद्यार्थ्यांचे अभ्यास आणि नोकरी यादरम्यान खच्चीकरण होत असते. मनामध्ये कितीही जिद्द असली तरी वेळ नसला तर गोष्टी अशक्य राहतात. परंतु, वेळ असण्याची नव्हे तर काढण्याची गोष्ट आहे. आपल्या व्यस्थ जीवनातून अभ्यासासाठी काही वेळ काढता आला तर काम बनू शकते.
नोकरी करून शिक्षण घेत असताना वेळेचे नियोजन फार महत्वाचे असते. यादरम्यान आपले काम व्यवस्थितरीत्या पूर्ण करून वेळ कधी उरतो? याचे उत्तर शोधा. त्या वेळेनुसार, स्वतःचे वेळापत्रक तयार करा. त्या वेळेनुसार आपल्या जीवनाच्या गाडीला गती द्या. सुरुवातील दररोज तेच गोष्टी पुन्हा करून नक्कीच कंटाळा येईल पण सवय होऊन जाईल. नोकरी करत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज कॉलेजला येणे जमत नाही. त्यामुळे ऑनलाईन लर्निंग उत्तम पर्याय ठरू शकतो. कोर्सेरा, एडएक्स, यूडेमी तसेच मूडलसारख्या लर्निंग प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन कोर्स करणे फायद्याचे ठरू शकते. तसेच युट्युबवर अनेक व्हिडीओ आहेत, ज्यांच्या माध्यमातून विद्यार्थी शिकू शकतात. महत्वाचे म्हणजे हे व्हिडीओ पाहून शिकण्यासाठी युट्युब कोणतेही कर आकारत नाही.
विद्यार्थी नोट्स बनवू शकतात, ज्याच्या आधारे परीक्षेची तयारी करू शकतात. परंतु, नोट्स आलेख तसेच तक्त्यांचा साहाय्याने तयार केले असतील तर नक्कीच गोष्टी लवकर समजण्यास सोपे होतील. एकीचे बळ दाखवणे कधीही उत्तम असते. अभ्यासू मुलांचा एक ग्रुप तयार करा. अशा विद्यार्थ्यांच्या नेहमी संपर्कात राहा. सगळ्या गोष्टींची शहानिशा करून आपल्या अभ्यासाला गती द्या. तुम्ही तयार केलेल्या स्टडी ग्रुपचे योग्य नियोजन करा. नियमित बैठका घ्या. अभ्यासामध्ये एकमेकांना मदत करा. याने अभ्यास करणे आणखीन सोपे होईल. शिक्षण आणि नोकरी अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडताना आपल्या आरोग्यावर लक्ष असू द्या. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित व्यायाम तसेच ध्यान करा.