फोटो सौजन्य - Social Media
एक्स्पोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECGC)ने भरती प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून Probationary Officer च्या पदासाठी उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या संदर्भात अधिसूचना ECGC ने आधीच जाहीर केली होती. या अधिसूचनेमध्ये या भरती संदर्भात सखोल तसेच महत्वाची सर्व माहिती नमूद आहे. इच्छुक उमेदवारांनी या अधिसूचनेचा आढावा नक्की घ्यावा. एक्स्पोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये ४० रिक्त पदांचा विचार केला जाणार आहे.
हे देखील वाचा : मीटर रीडर पदासाठी बंपर भरती; अर्ज करण्याची आज अंतिम तारीख
इच्छुक असलेल्या उमेदवारांना या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करता येणार आहे. १४ सप्टेंबर २०२४ पासून उमेदवारांना अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. तर इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑक्टोबरच्या १३ तारकेचपर्यंत अर्ज करण्याची मुभा आहे. अर्ज करण्यास एका महिन्याची मुभा देण्यात आली असून उमेदवारांनी या वेळेत अर्ज करण्याचे आवाहन ECGC ने दिले आहे. या वेळेनंतर केले जाणारे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
एक्स्पोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध अटी शर्ती लागू करण्यात आल्या आहेत. या अटी शर्ती उमेदवारांचे शिक्षण तसेच त्यांच्या आयु संदर्भात आहे. एका ठराविक वयोमर्यादेतील उमेदवारांनाच या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करता येणार आहे. या अटी शर्तींची अंमलबजावणी अधिसूचनेत केली गेली आहे. अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांचे किमान वय २१ वर्षे तर कमाल वय ३० वर्षे असले पाहिजे. तसेच अर्ज कर्ता उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधार असणे अनिवार्य आहे. या अटींना पात्र उमेदवारच या भरतीमध्ये सहभाग नोंदवू शकतो.
हे देखील वाचा : ITBPने सुरु केली १०वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती; ड्राइवर कॉन्स्टेबल पदासाठी करता येईल अर्ज
उमेदवारांच्या निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे.या परीक्षेतील गुणांच्या आधारे उमेदवाराचे भवितव्य ठरणार आहे. यात पात्र उमेदवारांची नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे. नियुक्त झालेल्या उमेदवाराला त्याच्या अनुभवानुसार वेतन देण्यात येईल. उमेदवारांनी केलेल्या अर्जामध्ये जर त्रुटी असती तर त्या १३ ऑक्टोबरपर्यंत सुधारण्याची मुभा आहे. तसेच अर्ज करण्याची मुदतीमध्येच उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. SC/ST/PwD प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १७५ रुपये असून इतर उमेदवारांना अर्ज करताना ८५० रुपयांचे अर्ज शुल्क म्हणून भुगतान करावे लागणार आहे.