फोटो सौजन्य - Social Media
रयत शिक्षण संस्थेने भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये सहायक प्राध्यापक पदाच्या रिक्त जागांचा विचार केला जाणार आहे. एकूण ६० पदांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या पदासाठी तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये करिअर घडवू पाहणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. जर तुम्ही या भरतीमध्ये अर्ज करण्यास इच्छुक आहात तर तुम्हाला एक बाब माहिती असणे गरजेचे आहे, कि या भरतीमध्ये मुलाखतीच्या आधारावर उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांना अर्ज करावे लागणार आहे. अर्ज करण्यास पात्र तसेच इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अंतिम कालावधी लक्षात घेऊन नियमाप्रमाणे ९ ऑक्टोबर २०२४ तारखेच्या अगोदर अर्ज करावयाचे आहे. महत्वाची बाब अशी आहे कि दिले गेलेल्या वेळेच्या मर्यादेतच आपल्याला अर्ज करायचे आहे, अन्यथा अर्ज स्वीकारले जाणार नाही.
हे देखील वाचा : गोव्यात आरोग्य विभागात नोकरीची संधी; अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात
रयत शिक्षण संस्थेने या भरतीच्या प्रक्रियेसंदर्भात एक जाहिरात प्रदर्शित केली आहे. या जाहिरातीमध्ये या भरतीच्या प्रक्रियेविषयक सर्व सखोल माहिती पुरवण्यात आली आहे. या भरतीमध्ये सहभाग घेऊ पाहणाऱ्या उमेदवारांनी या भरतीविषयक सर्व माहिती अभ्यासून घ्यावी आणि नंतर आपला निर्णय घ्यावा. नोकरीचे ठिकाण मुंबई आहे. मुंबईमध्ये नोकरीच्या शोधात आहात तर या संधीचा विचार जरूर करा. उमेदवारांच्या निवड प्रक्रियेमध्ये मुलाखतीचा समावेश आहे.
नियुक्तीसाठी उमेदवारांना मुलाखतीमध्ये पात्र होणे आवश्यक आहे. मुलाखत ८ ऑक्टोबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे. मुलाखतीसाठी उमेदवारांना ‘महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पनवेल. जि-रायगड’ या पत्त्यावर यायचे आहे. मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी आवश्यक ते सर्व दस्तऐवज सोबत आणावयाचे आहे. तसेच अर्ज करताना त्या सर्व दस्तऐवजांची पूर्तता करायची आहे.
हे देखील वाचा : 29 हजार 550 कोटींच्या प्रकल्पांना मान्यता, 38 हजारांहून जास्त रोजगार निर्मिती होणार !
रयत शिक्षण संस्थेच्या या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. १०० रुपये अर्ज शुल्क म्हणून भरून उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. महत्वाची बाब अशी आहे कि सहायक प्राध्यापकचे ६० रिक्त पदे तात्पुरत्या आधारावर भरले जातील. मार्गदर्शनासाठी जाहीर जाहिरातीचा आधार घ्यावा.