फोटो सौजन्य - Social Media
आरोग्य विभागामध्ये नोकरीच्या संधीच्या शोधात आहात तर हा लेख नक्की वाचा. जर नोकरीसाठी गोव्याला स्थलांतरित होण्याची तयारी आहे, तर तुम्ही या भरतीचा विचार नक्कीच केला पाहिजे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत गोवा राज्यात भरतीची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीसाठी अनके उमेदवारांनी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील विविध पदांसाठी हि भरती प्रक्रिया आयोजली आहे. एकूण ४६ रिक्त जागांचा विचार या भरती प्रक्रियेमध्ये केला जाणार आहे. याबाबत अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.
हे देखील वाचा : महावितरणची अप्रेंटिस पदासाठी भरती; लवकर करा अर्ज, अनुभव मिळवण्याची उत्तम संधी
सहाय्यक नर्स मिडवाईफ, स्टेट डेटा मॅनेजर, अकाउंटंट, कौन्सलर, स्टाफ नर्स, डेटा एंट्री ऑपरेटर, प्रयोगशाळेतील टेक्निशियन, नर्स, एपिडेमियोलॉजिस्ट, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉट्स प्लस साइट, वैद्यकीय अधिकारी, DR-टीबी सेंटर स्टॅटिस्टिकल असिस्टंट, सिनिअर ट्रेंटमेन्ट सुपरवायजर (STS), वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक (STLS), टीबी हेल्थ व्हिजिटर (TBHV) उत्तर/दक्षिण तसेच लॅब अटेंडंटसाठी असलेल्या रिक्त जागांचा विचार या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून केला जाणार आहे.
गोव्यातील या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी २३ ऑक्टोबर २०२४ पर्यंत आपला अर्ज नोंदवावा. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचे आहे. अर्जाचा फॉर्म उमेदरांनी काळजीपूर्वक भरून ‘सेमिनार हॉल, दुसरा मजला, आरोग्य सेवा संचालनालय, कॅम्पल पणजी, गोवा’ या पत्त्यावर पाठवायचे आहे. अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी या भरती संबंधित जाहीर करण्यात आलेली जाहिरात लक्षपूर्वक अभ्यासा. या अधिसूचनेमध्ये उमेदवारांना पात्र कराव्या लागणार्या शैक्षणिक अटी तसेच वयोमर्यादे संबंधित असणारे अटी शर्ती नमूद आहेत. यांना पात्र झाल्याशिवाय उमेदवारांना त्यांचे अर्ज नोंदवता येणार आहे.
हे देखील वाचा : मुंबई मेट्रोमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी; १२ ऑक्टोबरपर्यंत करता येईल अर्ज
२३ ऑक्टोबर अर्ज करण्याची शेवटची तारीख असून याच तारखेला उमेदवारांची मुलखात घेण्यात येणार आहे. अर्ज करण्यास पात्र असलेल्या उमेदवारांनी ऑक्टोबरच्या २३ तारखेला वर नमूद असलेल्या पत्त्यावर उपस्थित राहावे. या भारताविषयी असलेल्या अधिक दाखवलं माहितीसाठी अर्ज करण्यास इच्छुक व पात्र उमेदवारांनी www.goa.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्यात यावी.