Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Retirement Learning: जिद्द असावी तर अशी! ३३ वर्षे कोल इंडियात नोकरी केल्यानंतर वयाच्या ६८ व्या वर्षी शिकताहेत सायकोलॉजी

Retirement Learning:वयाच्या ६८ व्या वर्षी सहसा आरामाची वेळ मानली जाते, मात्र कोल इंडियातून निवृत्त झालेले डॉ. अशोक कुमार यांनी पुन्हा कॉलेजची वाट धरत सायकॉलॉजीचे शिक्षण घेण्याचा अनोखा निर्णय घेतला आहे. त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास वाचकांसाठी नक्कीच नवी ऊर्जा देणारा आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 10, 2026 | 08:49 AM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • ३३ वर्षे कोल इंडियात नोकरी केल्यानंतर वयाच्या ६८ व्या वर्षी शिकताहेत सायकोलॉजी
  • इंजिनिअरिंगनंतर मानवी मन समजण्याची उत्सुकता
  • साधे विद्यार्थी म्हणून कॉलेजमध्ये वावर
Retirement Learning: वयाची ६८ वर्षे म्हणजे सहसा विश्रांतीची आणि आरामाची वेळ मानली जाते. मात्र, रांचीचे ६८ वर्षीय डॉ. अशोक कुमार यांनी हे सिद्ध केले आहे की शिकण्याची कोणतीही वयोमर्यादा नसते. कोल इंडियामध्ये जनरल मॅनेजर पदावरून निवृत्त झालेले डॉ. अशोक कुमार सध्या वयाच्या ६८ व्या वर्षी सायकॉलॉजीचे (मानसशास्त्र) शिक्षण घेत आहेत. ते रोज पाठीवर बॅग अडकवून अगदी नियमितपणे महाविद्यालयात जातात, त्यांना असे पाहून कॉलेजचे प्राध्यापकही थक्क होतात.

इंजिनिअरिंगनंतर मानवी मन समजण्याची उत्सुकता

डॉ. अशोक यांनी कोल इंडियात तब्बल ३३ वर्षे सेवा बजावली आणि २०१४-१८ च्या सुमारास ते जीएम पदावरून निवृत्त झाले. त्यानंतर २०२५ मध्ये त्यांनी जेपी ग्रुपमध्ये व्हाईस प्रेसिडेंट आणि सल्लागार म्हणूनही काम केले. अभियांत्रिकी क्षेत्रात आयुष्यभर मोठ्या मशीन्स आणि त्यांचे मेकॅनिझम समजून घेतल्यानंतर, आता त्यांना मानवी व्यवहार आणि मन कसे काम करते हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा आहे. आपल्या कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि त्यांना उत्तम प्रकारे समजून घेण्यासाठी मानवी स्वभाव अभ्यासणे आवश्यक असल्याचे ते मानतात.

NEET UG 2026: MBBS च्या २ हजार जागांसाठी खूशखबर! MCCकडून विशेष फेरी जाहीर; २ नोव्हेंबरपासून अर्ज सुरू

साधे विद्यार्थी म्हणून कॉलेजमध्ये वावर

डॉ. अशोक यांचे कुटुंब आणि मित्र या निर्णयामुळे अत्यंत आनंदी असून ते नेहमीच त्यांना प्रोत्साहन देतात. त्यांची पत्नी देखील पोस्ट ग्रॅज्युएशन करू इच्छित होती, पण घरगुती जबाबदाऱ्यांमुळे तिला शक्य झाले नाही. मूळचे बिहारच्या खगडियाचे रहिवासी असलेले डॉ. अशोक कॉलेजमध्ये स्वतःला कोणत्याही माजी अधिकाऱ्यासारखे नाही तर एक सामान्य विद्यार्थी समजतात. त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासातून तरुणाईलाही सतत नवीन काहीतरी शिकत राहण्याची मोठी प्रेरणा मिळत आहे.

आजच्या स्पर्धात्मक युगात अनेक तरुण करिअरच्या सुरुवातीलाच तणावात असतात. अशा वेळी डॉ. अशोक कुमार यांनी वयाच्या ६८ व्या वर्षी घेतलेला हा निर्णय शिक्षण आणि आत्मविकासाला वयाची कोणतीही सीमा नसते हे सिद्ध करतो. त्यांचे हे पाऊल तरुण पिढीसाठी एक आदर्श वस्तुपाठ ठरत आहे.

COEP Tech 2026: ‘तंत्रज्ञानाचा वापर मानवजातीच्या विनाशासाठी नव्हे, तर….’ अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील यांचे आवाहन!

💡

Frequently Asked Questions

  • Que: वयाच्या ६८ व्या वर्षी कोणते शिक्षण घेतले जात आहे?

    Ans: कोल इंडियातून निवृत्त झालेले ६८ वर्षीय डॉ. अशोक कुमार सध्या सायकॉलॉजी (मानसशास्त्र) या विषयाचे शिक्षण घेत आहेत.

  • Que: डॉ. अशोक कुमार पूर्वी कोणत्या पदावर कार्यरत होते?

    Ans: ते सार्वजनिक क्षेत्रातील 'कोल इंडिया' कंपनीत जनरल मॅनेजर (GM) पदावरून निवृत्त झाले आहेत आणि त्यांनी तब्बल ३३ वर्षे सेवा बजावली आहे.

  • Que: या प्रेरणादायी प्रवासाचा उद्देश काय आहे?

    Ans: मानवी व्यवहार आणि मन कसे काम करते हे समजून घेण्याची तीव्र इच्छा आणि कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मानवी स्वभाव अभ्यासणे आवश्यक असल्याच्या विचारातून त्यांनी हा निर्णय घेतला.

Web Title: Retirement learning coal india retired gm psychology education

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 08:49 AM

Topics:  

  • education
  • Learn
  • psychology article

संबंधित बातम्या

CAT exam preparation: कमी दिवसांच्या अभ्यासाने मिळवा ९५ पर्सेंटाइल; वॉलमार्टच्या इंजिनिअरने दिल्या कॅट परीक्षेच्या खास टिप्स
1

CAT exam preparation: कमी दिवसांच्या अभ्यासाने मिळवा ९५ पर्सेंटाइल; वॉलमार्टच्या इंजिनिअरने दिल्या कॅट परीक्षेच्या खास टिप्स

IIT BHU Physical AI Course: आयआयटी बीएचयूमध्ये पुढील वर्षापासून सुरू होणार ‘फिजिकल एआय’चा बीटेक कोर्स, जाणून घ्या याबद्दल सविस्तर
2

IIT BHU Physical AI Course: आयआयटी बीएचयूमध्ये पुढील वर्षापासून सुरू होणार ‘फिजिकल एआय’चा बीटेक कोर्स, जाणून घ्या याबद्दल सविस्तर

Cost of Studying Abroad: विदेशात शिक्षण किती महाग? बीए सारख्या सामान्य पदवीसाठीही मोजावे लागतात लाखो रुपये!
3

Cost of Studying Abroad: विदेशात शिक्षण किती महाग? बीए सारख्या सामान्य पदवीसाठीही मोजावे लागतात लाखो रुपये!

CBSE Board Exam 2027: सीबीएसईने जारी केली १० वी आणि १२ वीच्या परीक्षांची विषयनिहाय गुण विभागणी; जाणून घ्या संपूर्ण पॅटर्न
4

CBSE Board Exam 2027: सीबीएसईने जारी केली १० वी आणि १२ वीच्या परीक्षांची विषयनिहाय गुण विभागणी; जाणून घ्या संपूर्ण पॅटर्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.