फोटो सौजन्य - Social Media
रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) द्वारे सहाय्यक लोको पायलट (ALP) पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण ९९०० पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना १० एप्रिलपासून अर्ज करता येणार आहे, याची नोंद घेण्यात यावी. तसेच या भरतीच्या संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांना त्याचा आढावा घेता येणार आहे. ९ तारखेपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
या भरतीसाठी पात्रता मानदंडांनुसार, उमेदवारांनी संबंधित ट्रेडमधून ITI/ डिप्लोमा किंवा पदवीधर (Graduation) परीक्षा मान्यताप्राप्त संस्थेमधून उत्तीर्ण केलेली असावी. याशिवाय उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 30 वर्षांपेक्षा अधिक नसावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. वयाची गणना 1 जुलै 2025 या तारखेआधारे केली जाणार आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया सुलभ असून, उमेदवारांनी सर्वप्रथम रेल्वे भरती मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. त्यानंतर ALP भरतीशी संबंधित लिंकवर क्लिक करून नवीन नोंदणी (Registration) करावी. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर इतर आवश्यक तपशील भरून अर्ज सबमिट करावा. अर्ज सबमिट करण्याआधी अर्जदारांनी वर्गानुसार निश्चित केलेले शुल्क ऑनलाइन भरावे लागेल. अर्ज भरल्यानंतर त्याची एक छायांकीत प्रत सुरक्षित ठेवावी.
अर्ज शुल्काची माहिती अशी आहे – जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्क 500 रुपये आहे, तर अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), दिव्यांग (PwBD) आणि माजी सैनिक (Ex-Servicemen) उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 250 रुपये आहे. शुल्क भरल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
ही भरती प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये होणार आहे – CBT 1, CBT 2 आणि CBAT. CBT 1 आणि 2 ही ऑनलाइन परीक्षाच असतील. या दोन्ही परीक्षांमध्ये पात्र ठरलेले उमेदवार CBAT परीक्षेस पात्र ठरतील. यानंतर कागदपत्र पडताळणी प्रक्रियेनंतर अंतिम निवड केली जाईल. सर्व टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची निवड करण्यात येईल.