फोटो सौजन्य - Social Media
बँकेत स्थिर आणि प्रतिष्ठित नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी चालून आली आहे. आयडीबीआय बँकेने (IDBI Bank) ‘स्पेशलिस्ट ऑफिसर’ (SCO) पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली असून यामार्फत एकूण 119 रिक्त पदांवर भरती होणार आहे. या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी बँकेच्या idbibank.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. अर्ज प्रक्रिया 7 एप्रिलपासून सुरू झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2025 निश्चित करण्यात आली आहे.
या भरतीच्या माध्यमातून उपमहाव्यवस्थापक (DGM) पदासाठी 8 पदे रिक्त आहेत. असिस्टंट जनरल मॅनेजर (AGM) ग्रेड C पदासाठी 42 पदे रिक्त आहेत. तर मॅनेजर ग्रेड B पदासाठी 69 पदे रिक्त आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवाराना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या भरतीसंदर्भात निकष जाणून घेऊयात:
पात्रता व वयोमर्यादा:
IDBI बँकेच्या या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव संबंधित पदांनुसार वेगवेगळा आहे. DGM पदासाठी वयमर्यादा 35 ते 45 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. तर AGM पदासाठी वयमर्यादा 28 ते 40 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. Manager पदासाठी वयमर्यादा 25 ते 35 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
अशा प्रकारे करता येईल अर्ज:
मुळात, या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. निवड ही बहुस्तरीय प्रक्रिया असेल – ज्यामध्ये प्राथमिक शॉर्टलिस्टिंग, कागदपत्र पडताळणी, आणि गट चर्चा किंवा वैयक्तिक मुलाखत यांचा समावेश असेल. ही संधी गमावू नका! बँकिंग क्षेत्रात उज्वल भविष्याची सुरुवात करण्यासाठी ही योग्य वेळ आहे.