Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खरंय शिक्षणाला वयाची अट नसते; 81 व्या वर्षात घेतला कॉलेजमध्ये प्रवेश

शिक्षणासाठी वयाची अट नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. 81 व्या वर्षी एका व्यक्तीने पुन्हा विद्यार्थी दशेत प्रवेश केला आहे. त्यांनी महाविद्यालयातील प्रथम वर्षात प्रवेश घेत ते सर्वांसाठी आदर्श ठरले आहेत.

  • By नारायण परब
Updated On: Nov 27, 2024 | 11:40 PM
खरंय शिक्षणाला वयाची अट नसते; 81 व्या वर्षात घेतला कॉलेजमध्ये प्रवेश
Follow Us
Close
Follow Us:

माणसाच्या प्रगतीसाठी शिक्षण हा सर्वात महत्वाचा घटक आहे. शाळेतून तुम्हाला प्राथमिक शिक्षण दिले जाते तर महाविद्यालयात तुम्ही ज्या क्षेत्रात करिअर करु इच्छिता त्या क्षेत्राच्या अभ्यासक्रमाचा निवड करु शकता. अनेकांना शिक्षणात रसही नसतो  मात्र  अनेकांच्या शिक्षणामध्ये काही अडचणी येतात त्यामुळे त्यांना शिक्षण मध्येच सोडून द्यावे लागते. त्यातील अगदी काहीच जण नंतरच्या काळात शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतात. त्यातील सर्वात मोठे उदाहरण ठरले आहेत 81 वर्षीय सतपाल अरोरा. त्यांनी लॉ कॉलेजमध्ये प्रथम वर्षाला प्रवेश घेतला आहे.

राजस्थान चित्तौडगढ शहरातील प्रतापगड येथे राहणाऱ्या 81 वर्षीय सतपाल अरोरा यांनी हे सिद्ध केले आहे की, शिक्षण घेण्यासाठी वयाची कोणतीही अट नसते.  लॉ कॉलेजमध्ये एलएलबीच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला असून त्यांचे हे पाऊल सर्वांसाठी आदर्शवत आहे. त्यांनी नव्या पिढीतील विद्यार्थ्यांसोबत अभ्यासाचा प्रवास पुन्हा सुरू केला आहे. यामुळे महाविद्यालयीन कर्मचारी आणि इतर विद्यार्थ्यांसाठी हा अनुभव केवळ प्रेरणादायीच नाही तर अद्भुतही आहे.

कोका-कोलाने 100 शाळांना दिले डिजिटल स्मार्टबोर्डस् ! 15000 हून अधिक विद्यार्थ्यांना होणार फायदा

सतपाल अरोरा यांनी 40 वर्षांनंतर पुन्हा एकदा कॉलेजमध्ये पाऊल ठेवले

सतपाल अरोरा हे महाविद्यालयात नियमितपणे येतात आणि त्यांच्या नातवांच्या वयांच्या विद्यार्थ्यांसोबत  अभ्यास करतात. त्याच्या या प्रयत्नांनी सर्वांनाच प्रभावित केले आहे. वर्गात बसून लेक्चरला बसण्याची आणि शिकण्याची त्याची तळमळ कोणत्याही  विद्यार्थ्यापेक्षा कमी नाही.सतपाल अरोरा यांनी 40 वर्षांनंतर पुन्हा एकदा कॉलेजमध्ये पाऊल ठेवले आहे. अरोरा यांनी  एमए पूर्ण केल्यानंतर कायद्याची पदवी घेण्याचे ध्येय ठेवले आहे. आपल्या ओळखीच्या आणि कॉलेजच्या लेक्चररशी चर्चा केल्यानंतर त्यांनी लॉ करण्याचा निर्णय घेतला.

एलएलबीनंतर सतपाल यांचे पीएचडी करण्याचे स्वप्न

अरोरा यांचे मत आहे की, वय हा कोणत्याही कामात कधीही अडथळा बनू नये. जगण्यासाठी आपण नेहमी काहीतरी  शिकत राहिले पाहिजे. एलएलबीनंतर पीएचडी करण्याचेही त्याचे स्वप्न आहे.

एक प्रेरणादायी व्यक्तीमत्व

आपल्या दोन मुलांसह आनंदी कौटुंबिक जीवन जगणाऱ्या अरोरा यांनी शिक्षणाचा घेतलेला ध्यास निवृत्तीनंतर आपण आता निष्क्रिय होणाऱ्या  प्रेरक आहेच शिवाय त्यांचा शैक्षणिक प्रवास हा सर्वांनाच प्रेरणादायी आहे.

UIDAI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! पगार तब्बल 2 लाख रुपयांपर्यंत

शिक्षणासाठी स्वयंप्रेरणेचे महत्व 

त्यामुळे शैक्षणिक प्रवास कोणताही व्यक्ती कधीही सुरु करु शकतो हे अशा व्यक्तीमत्वांमुळे कळते. आजच्या काळात तर नवनवीन तंत्रज्ञान बदलत चालले आहे त्यामुळे प्रत्येकालाच ते तंत्रज्ञान अवगत करणे हे नोकरीसाठी व्यवसायासाठी आवश्यक असते. त्याशिवाय त्याला दुसरा पर्याय नसतो मात्र एखादा अभ्यासक्रम स्वत:हून शिकण्याची असलेली स्वयंप्रेरणा ही प्रत्येक व्यक्तीसाठी महत्वाची असते. ती स्वयंप्रेरणा त्या व्यक्तीला शिक्षित बनवतेच आणि त्यामुळेच सतपाल अरोरा यांच्यासारखे आदर्श समाजासमोर येतात.

Web Title: Satpal arora took admission in college at the age of 81

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2024 | 11:40 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.