हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस् (एचसीसीबी)ने वाय४डी फाऊंडेशनसोबत सहयोगाने महाराष्ट्र, ओडिशा, गुराजत, मध्यप्रदेश, गोवा, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू व तेलंगणा येथील तब्बल १०० प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये डिजिटल स्मार्टबोर्डस् यशस्वीरित्या स्थापित केले आहेत. कोका कोलाच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) प्रोग्रामचा भाग असलेल्या या उपक्रमाचा जवळपास १५,००० विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शैक्षणिक तंत्रज्ञानाला एकीकृत करत, परस्परसंवादात्मक व सहभागात्मक अध्ययन वातावरणाला चालना देत वर्गातील अध्ययनामध्ये सुधारणा करण्याचा मनसुबा आहे.
डिजिटल स्मार्टबोर्डसचे महत्व
वर्गामध्ये तंत्रज्ञानाना एकीकृत करत नवीन स्थापित करण्यात आलेल्या स्मार्टबोर्डसचा परस्परसंवादात्मक, सहभागात्मक व डायनॅमिक अध्ययन वातावरणाला चालना देण्याचा मनसुबा आहे. डिजिटल स्मार्टबोर्डस् वर्गातील अध्ययन अनुभवाने आधुनिकीकरण करण्यामध्ये आवश्यक टूल म्हणून सेवा देतील, ज्यामुळे शिक्षक अधिक परस्परसंवादात्मक अध्यापन करू शकतील आणि व्हिज्युअल व डिजिटल साधनांच्या माध्यमातून गुंतागूंतीच्या संकल्पना आत्मसात करण्याची विद्यार्थ्यांची क्षमता वाढेल.
या उपक्रमाबाबत मत व्यक्त करत एचसीसीबीचे चीफ पब्लिक अफेअर्स, कम्युनिकेशन्स अँड सस्टनेबिलिटी ऑफिसर हिमांशू प्रियदर्शी म्हणाले, “शिक्षण सामाजिक परिवर्तनासाठी प्रमुख उत्प्रेरक आहे आणि वर्गांमध्ये तंत्रज्ञानाचे एकीकरण आपल्या समुदायांच्या उज्ज्वल भविष्याप्रती धोरणात्मक गुंतवणूक आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक साधनांसह सक्षम करत आणि परस्परसंवादात्मक अध्ययन वातावरणाला चालना देत आम्ही त्यांच्या शैक्षणिक अनुभवांमध्ये सुधारणा करत आहोत, तसेच त्यांना झपाट्याने विकसित होत असलेल्या विश्वासाठी आवश्यक महत्त्वपूर्ण डिजिटल कौशल्यांसह सक्षम देखील करत आहोत. हा उपक्रम शाश्वत व सर्वसमावेशक विकासाला चालना देण्याप्रती, तसेच आजच्या काळातील विद्यार्थ्यांना माहिती-केंद्रित अर्थव्यवस्थेमध्ये भावी प्रमुख बनण्यास सुसज्ज करण्याप्रती आमच्या व्यापक कटिबद्धतेशी संलग्न आहे.’’
वॉश (WASH) (वॉटर, सॅनिटेशन आणि हायजिन)
शैक्षणिक पायाभूत सुविधा वाढवण्याच्या प्रयत्नांशी बांधील राहत एचसीसीबी आपल्या शिक्षण-केंद्रित उपक्रमांमध्ये वॉश (WASH) (वॉटर, सॅनिटेशन आणि हायजिन) जागरूकतेचा प्रसार करण्यावर प्रबळ भर देते. शैक्षणिक यशासाठी उत्तम अध्ययन वातावरण महत्त्वाचे आहे, ही बाब जाणून घेत एचसीसीबी अनेक राज्यांमध्ये वॉश जागरूकता सत्रांचे आयोजन करते. या सत्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्तम हात धुण्याच्या पद्धती, सुरक्षित पिण्याच्या पाण्याच्या सवयी आणि योग्य कचरा व्यवस्थापन अशा आवश्यक स्वच्छता पद्धतींबाबत माहिती दिली जाते. या सत्रांना पूरक म्हणून स्वच्छता किट्सचे वितरण केले जाते, ज्यामुळे विद्यार्थी या पद्धतींचा अवलंब करण्यास आणि शाळेमध्ये स्वच्छ, आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यास सक्षम होतात.
तसेच, एचसीसीबीने शिक्षण व स्वच्छतेसह आधुनिक स्वच्छता सुविधांचे बांधकाम, शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आरओ युनिट्सचे इन्स्टॉलेशन आणि शैक्षणिक गरज लक्षात घेऊन शालेय फर्निचरची तरतूद अशा महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा सुधारणा सुरू केल्या आहेत. हे एकत्रित प्रयत्न शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासोबत विद्यार्थी त्यांचे सर्वांगीण आरोग्य व स्वास्थ्य उत्तम राखणाऱ्या वातावरणात प्रगती करण्याची खात्री देखील घेतात.






