फोटो सौजन्य- iStock
सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटीमध्ये (UIDAI) उपसंचालक आणि वरिष्ठ लेखाधिकारी पदांसाठी रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ज्यांना या पदाकरिता अर्ज करायचा आहे असे पात्र उमेदवार UIDAI च्या अधिकृत वेबसाइट uidai.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. 20 जानेवारी 2025 पर्यंत अर्जप्रक्रिया सुरु राहणार आहे.
UIDAI च्या या भरतीप्रक्रियेतून अधिकारी पदे भरली जाणार आहेत. तुम्हालाही या पदांसाठी अर्ज करायचा असेल, तर पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेल्या गोष्टी काळजीपूर्वक वाचा.
नोकरीसाठीची पात्रता
UIDAI च्या या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या कोणालाही अधिकृत अधिसूचनेत दिलेली संबंधित पात्रता असणे आवश्यक आहे.
नोकरीसाठीची वयोमर्यादा
या भरतीप्रक्रियेत सहभाग घेणाऱ्या पात्र उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा अर्जाच्या शेवटच्या तारखेनुसार 56 वर्षे असावी. त्यानंतरच उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरु शकतात.
वेतन
भरतीप्रक्रियेतून निवड झालेल्या अधिकाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी दिली जाणार आहे.
उपसंचालक: वेतन मॅट्रिक्स स्तर-11 अंतर्गत दरमहा रु. 67700 ते रु. 208700
वरिष्ठ लेखाधिकारी: पे मॅट्रिक्स स्तर-10 अंतर्गत दरमहा रु. 56100 ते रु. 177500
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 20 जानेवारी 2025
अर्ज करण्यासाठी लिंक आणि सूचना
इच्छुक उमेदवारांनी अधिकृत अधिसूचनेमधून अर्ज डाउनलोड करा आणि तो योग्यरित्या भरा. अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडा आणि शेवटच्या तारखेपर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर जमा करा.
अर्ज पाठवण्याचा पत्ता-
संचालक (मानव संसाधन), युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI),प्रादेशिक कार्यालय,ब्लॉक-व्ही, पहिला मजला, हाउसफेड कॉम्प्लेक्स, बेलटोला-बसिष्ठ रोड, दिसपूर, गुवाहाटी – 781006.
युआयडीआएच्या भरती प्रक्रियेसंबंधीची लिंकसाठी इथे क्लिक करा
ज्या उमेदवारांना या नोकरभरतीत सहभागी व्हायचे आहे त्यांनी याकरिता तात्काळ अर्ज करावा.
भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटीबद्दल (UIDAI)
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ही संस्था एक वैधानिक प्राधिकरण आहे. जी भारतीय रहिवाशांना आधार क्रमांक जारी करते. या संस्थेचा उद्देश यूआयडीएआयचा उद्देश युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (यूआयडी) जारी करणे आहे. आधार कार्ड हे कोणत्याही भारतीयासाठी महत्वाचे कागदपत्र आहे जे या संस्थेंद्वारे तयार केले जाते.
UIDAI ची कार्ये
आधार डॅशबोर्ड
आधार डॅशबोर्ड हे देशभरातील आधार प्रकल्पाच्या कामगिरीचे ऑनलाइन सूचक आहे. हे आधार निर्मिती, डेटा अपडेट, प्रमाणीकरण आणि eKYC व्यवहारांबद्दल तपशीलवार विश्लेषण प्रदान करते.






