SBI ते इंडिया पोस्ट पेमेंट बँक, या आठवड्यात सरकारी नोकरीसाठी इथे भरा अर्ज
तुम्ही बँकींग किंवा सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. 2024 या सरत्या वर्षातल्या शेवटच्या आठवड्यात सरकारी विभागात नोकर भरतीची सुरुवात होत आहे. कोणत्या पदांसाठी या जागा आहेत जाणून घ्या.
बँक ऑफ बडोदामध्ये 1267 एसओ पदांसाठी रिक्त जागा भरण्यात येत आहे. बँक ऑफ बडोदाने स्पेशालिस्ट ऑफिसर (SEO) या पदासाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. पात्रता निकष पूर्ण करणारे इच्छुक उमेदवार 17 जानेवारी 2025 पर्यंत बँकेच्या अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेअंतर्गत, बँकेचे एकूण 1,267 व्यवस्थापक आणि इतर रिक्त पदांच्या भरतीबाबत अधिकृत माहिती बँकेच्या संकेतस्थळावर मिळेल.
नागपूर महानगरपालिका (NMC) ने विविध विभागांमध्ये एकूण 245 पदांसाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार, वय 18-38 वर्षे असणं अपेक्षित आहे. या आवड्यापासून ते 15 जानेवारी 2025 पर्यंत हा अर्ज तुम्ही भरु शकता. महानगरपालिकेच्या या रिक्त जागांसाठी ही सिव्हिल इंजिनीअर असिस्टंट, नर्स (GNM), कनिष्ठ अभियंता आणि इतर अधिकारी पदांसाठीच्या जागा भरण्यात आहे. या पदांसाठीचे वेतन देखील नागपूर महानगरपालिकेकडून सांगण्यात आले आहेत.
आरोग्य विभागातील नर्ससाठी दरमहा रु. 35,400 ते रु. 1,12,400 असणार आहे. त्याचप्रमाणे वनअधिकारी आणि सहाय्यक अभियंता यांच्यासाठी रु. 35,400-1,12,400 रु 25,500-रु. 81,100 दरम्यान वेतन असणार आहे. याबाबत सविस्तर माहिती नागपूर महानगरपालिका कार्यालयात मिळणार आहे.
तम्हीसुद्धा बॅंकीग क्षेत्रात नोकरीच्या शोघात असाल तर स्टेट बैंक ऑफ इंडिया कडून तुम्हाला सुवर्ण संधी मिळत आहे. स्टेट बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी रिक्त जागा भरण्यात येत आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना 16 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. या पदांसाठी पात्र उमेदवार हा पदवीधर असणं गरजेचं आहे. तसंच उमेदवाराचं वय 21 ते 30 वर्ष असणं अपेक्षित आहे. यासाठी SBI मध्ये 600 रिक्त जागांची भरती सुरु आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत मुख्य अधिकारींसाठी 68 पदांच्या जागा खाली आहेत. त्याचबरोबर इतर पदांसाठी अर्ज भरताना उमेदवाराला अर्जासाठी 750 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर एससी / एसटी / पीडब्ल्यूडी प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांना 150 रुपये शुक्ल द्यावे लागणार आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवारांना महिना 1.4लाख ते 2.2 लाख रुपये पगार असणार आहे.
UPSSSC मध्ये कनिष्ठ सहाय्यकाच्या 2702 पदांसाठी भरती होत आहे. या विभागातील कनिष्ठ सहाय्यक पदांच्या भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. याची अंतिम तारीख 29 जानेवारी 2025 आहे. UPSSSC
या रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी अनारक्षित प्रवर्गाातील 1,099, मागासवर्गीय SC प्रवर्गासाठी 583 तर ST 64 आणि ओबीसी वर्गासाठी 718 तर इतर प्रवर्गासाठी 238 पदं रिक्त आहेत. त्यामुळे येणाऱ्या 2025 च्या सुरुवातीला सरकारी विभागात नोकरीची सुर्वणसंधी आहे.